घरसंसदीय अधिवेशन 2022भारत - चीन सीमावादाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग

भारत – चीन सीमावादाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग

Subscribe

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात चिनी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना त्यांच्या निर्धारित जागेपर्यंत मागे ढकलले. या चकमकीत भारताचा एकही सैनिक मरण पावला नाही, तसेच कोणीही गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. मात्र यावर विरोधी पक्षांना राज्यसभेच्या परंपरेप्रमाणे स्पष्टीकरण अथवा प्रश्न विचारण्यास संधी न मिळाल्याने निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.

चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणग्यांवरून आज भाजपने गंभीर केले. हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला गेल्यानंतर काँग्रेस बचावाच्या पवित्र्यात गेल्याचे दिसले. काँग्रेसने चीनकडून देणग्या घेतल्या त्यामुळे त्यांना या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले, यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, राजनाथ सिंह यांचे वक्तव्य वाचून सभागृहाबाहेर गेले, ते कोणत्याही स्पष्टीकरणासाठी आणि चर्चेला तयार नाहीत. त्या प्रकरणाचा राजीव गांधी फाऊंडेशनचा एफसीआरए परवाना रद्द करण्याच्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. आमची चूक असेल तर आम्हाला फाशी द्या.

- Advertisement -

राज्यसभेत आजपासून चीन आणि भारतीय सैन्यात झालेल्या चकमकीचा मुद्दा गाजतोय. काँग्रसने यावर चर्चेसाठी कामकाज रोखून धरले तेव्हा सुरुवातीला यावर राजनाथ सिंह दुपारी 2 वाजता निवेदन सादर करतील असे सांगितले, यानंतर सरकारने कामकाज पत्रिकेत दुरुस्ती करत निवेदनाची वेळ 12.30 करण्यात आली, मात्र गोंधळ न थांबल्याने शून्य प्रहरातील काही मुद्दे मांडल्यावर कामकाज स्थगित करण्यात आले.

यानंतर दुपारी 12 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांनी आधी चर्चा करा मग निवेदन अशी मागणी केली, मात्र ती मागणी सरकारने फेटाळली. यावेळी काँग्रेस खासदारांनी पुन्हा वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरु केली, जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून चीन सैन्य फिरत फिरत भारतीय हद्दीत घुसून सैन्यावर हल्ला करून निघून जातो, पण पंतप्रधान आणि हे सरकार मूग गिळून शांत आहे, असा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला.


तैवानबाबत राजकारण करणं चुकीचं; केंद्र सरकारला काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पाठिंबा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -