घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे कोत्या मनाचे; अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसेचा खोचक टोला

उद्धव ठाकरे कोत्या मनाचे; अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसेचा खोचक टोला

Subscribe

ही भूमिका घेण्याबद्दल उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचं कौतुक केलं आणि राज ठाकरेंची दखल घेतली नाही. यावरही संदीप देशपांडे म्हणाले, शिवसेनेला वाटले असेल की भाजपने माघार घेतली तर त्याचे श्रेय राज ठाकरेंना जाईल.

अंधेरी पोटनिवडणुकीवरून (andheri by-election) चांगलंच राजकारण तापलं आहे. दरम्यान मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) यांना अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवड करण्याचे पत्र लिहिले होते. त्यामुळे ऋतुजा लटके (rutuja latake) यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरूनच आता श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी प्रतिक्रिया देत खोचक टोला सुद्धा लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कोत्या मानाचं आहे. त्यामुळेच शरद पवारांना (sharad pawar) पुढे केलं. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप कडून मुरजी पटेल हे निवडणूक लढवत होते. मात्र भाजपने त्यांच्या उमेदवार मागे घ्यावा अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. पण शिवसेनेला राज ठाकरे यांना याचं श्रेय द्यायचं नव्हतं म्हणूनच त्यांनी शरद पवारांना पुढे केलं. असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latake) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणूक होते आहे. 14 ऑक्टोबर रोजी यासाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी शिवसेना-उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरला. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत अर्ज उमेदवारीचा भरला.

पण रविवारी 16 ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीनुसार, भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, अशी विनंती केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तीच विनंती केली. त्य्यामुळेच आज 17 ऑक्टोबर रोजी मुरजी पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

- Advertisement -

राज ठाकरेंनी विनंती केल्यानंतर शरद पवार यांनीही भूमिका जाहीर करहे, ही शिवसेनेची खेळी आहे, असा आरोप मनसेने केला आहे. भाजप पराभवाच्या छायेत असल्याने त्यांच्या वतीने राज ठाकरेंनी ही विनंती केल्याचा आरोप केला जातोय. यावर संदीप देशपांडे म्हणाले, एवढ्या कोत्या मनोवृत्तीने विचार करू नये. दरम्यान अंधेरी मतदार संघात मुरजी पटेल यांचं काम सुद्धा खूप चांगलं आहे. त्यात ही निवडणूक होणे म्हणजे राजकारणात जो चिखल झालाय, तो वाढला असता. पण आता या गोष्टी टाळल्या गेल्या आहेत.

ही भूमिका घेण्याबद्दल उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचं कौतुक केलं आणि राज ठाकरेंची दखल घेतली नाही. यावरही संदीप देशपांडे म्हणाले, शिवसेनेला वाटले असेल की भाजपने माघार घेतली तर त्याचे श्रेय राज ठाकरेंना जाईल. त्यांचे आभार मानण्याऐवजी शरद पवारांचे आभार मानता येतील, म्हणून त्यांनी पवार यांना पत्रकार परिषद घेण्यास सांगितले दरम्यान राज ठाकरे यांचे कौतुक करताना संदीप देशपांडे म्हणाले, राज ठाकरे हे फक्त नावाचे नाहीत, तर मनानेही राजे आहेत. कुणावर काय संस्कार आहेत, त्यानुसार ते वागतात. राज ठाकरेंवर प्रबोधनकारांचे संस्कार आहेत. त्यामुळे राजकारणाच्या पलिकडे जाऊन ते विचार करतात.


हे ही वाचा –  संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब, पुन्हा सुनावणी कधी?

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -