घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब, पुन्हा सुनावणी कधी?

संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब, पुन्हा सुनावणी कधी?

Subscribe

मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना पीएमएलए न्यायालयात आज हजर करण्यात आले होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीकडून चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

१० ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायलायाने वेळेअभावी जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली होती. त्यानुसार, पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. मात्र, आजचीही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

- Advertisement -

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी ६७२ घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु २०१०मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -