घरठाणे४४ वर्षांनी योग, सहपत्नी आरतीचा मान; आमदार संजय केळकरांवर टेंभीनाक्याच्या अंबेमातेचा आशीर्वाद

४४ वर्षांनी योग, सहपत्नी आरतीचा मान; आमदार संजय केळकरांवर टेंभीनाक्याच्या अंबेमातेचा आशीर्वाद

Subscribe

शिंदे हे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांचे प्रतिबिंब म्हणून नाव रूपास आले होते. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या उत्सवाची परंपरा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. त्यातच शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हा उत्सव साजरा होत असल्याने सर्वांचे या उत्सवाकडे डोळे लागून आहे.

ठाणे – महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि आनंद दिघेंची देवी म्हणून नावलौकिक असलेल्या ठाणे येथील टेंभीनाक्यावरील अंबेमातेच्या आरतीचा मान पहिल्यांदाच ठाणे शहर मतदारसंघाचे भाजप आमदार संजय केळकर यांना सहपत्नी मिळाला. हा मान नवरात्री उत्सव स्थापनेच्या तब्बल ४४ वर्षांनी मिळाला आहे. देवीच्या आरतीची संधी म्हणजे एकप्रकारे देवीचा आशीर्वादच मिळाल्याची अख्यायिका आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजविणारे कृत्य, ठाण्यातील शिवसेना प्रवक्त्यांचा सवाल

- Advertisement -

दिवंगत आनंद दिघे आणि आमदार संजय केळकर यांचे नाते हे मैत्रीच्याही पलीकडचे होते. त्यांची ती मैत्री जगजाहीर होती. दरम्यान दिघे यांनी टेंभीनाक्यावर स्वपक्षीय नवरात्री उत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून आमदार केळकर हे न चुकता नित्यनियमाने टेंभीनाक्यावरील आंबेमातेच्या दर्शनाला आवर्जून जातात. मात्र, दिघे यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या निधनाच्या पश्चात मित्रपक्षाचा आमदार म्हणून कधी वैयक्तिक किंवा सहपत्नी केळकर यांना देवीची आरती करण्याचे संधी चालून आली नाही किंवा मिळालीच नव्हती.

पण, नुकतेच महाराष्ट्रात सत्तातंर झाले. हिंदुत्वाच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या मतावर शिवसेना व भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. त्यातच, मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा मान ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे यांना मिळाला. तर, शिंदे हे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांचे प्रतिबिंब म्हणून नाव रूपास आले होते. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या उत्सवाची परंपरा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. त्यातच शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हा उत्सव साजरा होत असल्याने सर्वांचे या उत्सवाकडे डोळे लागून आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  माथाडींना हक्काच्या घरांसाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

या उत्सवाला राजकीय मंडळींची हजेरी महत्त्वाची मानले जात असताना, मंगळवारी सायंकाळी युतीचे आणि ठाणे शहर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयश्री झालेले संजय केळकर हे सहपत्नी टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनाला गेले होते. नवरात्री उत्सवाच्या स्थापनेनंतर म्हणजे ४४ वर्षांनी पहिल्यांदाच त्यावेळी कळत-नकळत केळकर दाम्पत्याच्या हस्ते देवीच्या आरतीचा योग आला आणि या दाम्पत्याने मनोभावे देवीची आरती केली. तसेच हे केळकर दाम्पत्याचे भाग्यच म्हणावे लागले, असे त्यांच्या काही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -