घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांच्या मनातील आणि डोक्यातील मळमळ बाहेर आली; संजय राऊतांचा टोला

चंद्रकांत पाटलांच्या मनातील आणि डोक्यातील मळमळ बाहेर आली; संजय राऊतांचा टोला

Subscribe

 

मुंबईः मंत्री चंद्राकांत पाटील यांच्या मनातील आणि डोक्यातील मळमळ बाहेर पडली आहे. ही मळमळ मिंधे हातात घेत असतील तर आमची काहीच हरकत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हाणला.

- Advertisement -

संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, कॉंग्रेसने सावरकरांविषयी जी भूमिका माडंली. ती आम्हाला पटली नाही. आम्ही थेट आमची भूमिका मांडली. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आता चंद्रकांत पाटील यांना विरोध करुन दाखवा, असे आवाहन खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.

माझ्या मुलाखतीचा विपर्यास केला गेला, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे, या प्रश्नावर खासदार राऊत म्हणाले, त्यांच्या मुलाखतीचा अजिबात विपर्यास केलेला नाही. बाळासाहेबांबद्दल बोलायला ते एवढे हलके नाहीत. विपर्यास वाटत असेल तर त्यांनी मुलाखत नाकारावी. तसेच मिंधे यांना वाचता आणि ऐकता येत असेल त्यांनी चंद्रकात पाटील यांची मुलाखत नीट ऐकावी. त्यांनतर राजीनामा द्यावा.

- Advertisement -

संजय राऊत हे बाबरी मशिद पाडायल नव्हते, असा आरोप चंद्राकात पाटील यांनी केला आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्यावेळी मी कुठेही असेन. आधी तुम्हा उत्तर द्यायला हवे. उदय सामंत हे आधी शिवसेनेत होते. नंतर राष्ट्रवादी गेले आणि मग कॉंग्रेसमध्ये गेले. फिरुन आलेल्यांवर काय विश्वास ठेवणार. त्यांना भावना आणि श्रद्धा काहीच नसते. मिंधे गट हे पोळ्या खात आहेत. भाजप त्यावर तूप टाकत आहे, असा निशाणाही खासदार राऊत यांनी साधला.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदच्या मुद्द्यावर भाष्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाबरी मस्जिद पाडणारे शिवसैनिक नव्हते. त्यावेळी बाबरी पाडणारे सगळे हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्त्वाखाली काम करत होते. त्यामुळे त्यावेळी कोणीही पक्षाचे नव्हते. शिवसैनिक म्हणून शिवसेनच्या लोकांनी बाबरी पाडली नाही. तसेच, बाळासाहेबांबाबत माझ्या मनात आदरच आहे. त्यांच्यामुळेच आज हिंदू जीवंत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा खासदार राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -