घरमहाराष्ट्रसोमय्या कुटुंबाने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केला; संजय राऊतांचा आरोप

सोमय्या कुटुंबाने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केला; संजय राऊतांचा आरोप

Subscribe

या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवं. शरद पवार यांच्यावर ट्विटवर ट्विट केले. एखादं तरी ट्विट त्यांनी आयएनएस घोटाळ्यावरती करावं. एखादं ट्विट त्यांनी टॉयलेट घोटाळ्यावर जो आम्ही आता काढणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यासंदर्भातील कागद सुपूर्द केली आहेत, असं राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, “लवकरच मी या महाशयांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा घोटाळा केला आहे. कुठे कुठे पैसे खातात तर विक्रांत पासून टॉयलेटपर्यंत. ही सगळी कागपत्र सुपूर्द झाली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची संस्था हे लोकं चालवत होते, त्यांचं कुटुंब चालवत होते. त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला. मला पाहून हसायलाच आलं. खोटी बिलं, त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे घोटाळे पैसे कसे काढले हा घोटाळा लवकरच बाहेर येईल, तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा,” असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवं. त्यांना भ्रष्टाचाराविरोधी फार मोठी कणव आहे. त्यांची, साऱ्या भाजपच्या लोकांची राष्ट्रभक्ती उचंबळून जात असते. शरद पवार यांच्यावर ट्विटवर ट्विट केले. एखादं तरी ट्विट त्यांनी आयएनएस घोटाळ्यावरती करावं. एखादं ट्विट त्यांनी टॉयलेट घोटाळ्यावर जो आम्ही आता काढणार आहोत.”

राऊत म्हणाले, “१०० कोटींच्या वर हा घोटाळा आहे. आता ते म्हणतील पुरावे कुठे आहेत. पुरावे कुठे आहेत ते त्यांनाही माहिती आहे. अहवाल काय आहे ते देखील त्यांना माहिती आहे. तुम्ही आमच्यावर कितीही अशाप्रकारचे हल्ले केलेत. आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याचे उत्तर द्या. विक्रांतवर आपण उत्तर देऊ शकला नाही. सत्र न्यायालयाने जे प्रश्न विचारलेत तुम्हाला, सत्र न्यायालया मुर्ख आहे का? ती ही न्यायव्यवस्थाच आहे ना. हुशार लोक आहेत ती, त्यांना न्यायव्यवस्थेत मानाचं स्थान आहे. जामीन नाकारताना तुमच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पुरावे काय मागताय? राजभवन सांगतंय तुमचं पैसे जमा झालेले नाहीत म्हणून…बातमीच्या कात्रणावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे. न्यायव्यवस्थेने डोळ्याला पट्टी बांधली असली तरी, पण त्या पट्टीला छिद्र पडलं आहे, त्या छिद्रातून ते आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहतेय,” असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

“राकेश वाधवनची जमीन तुमच्या मुलालाच कशी मिळाली याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी ज्याच्यावर दबाव आणून जमीन हडपली. त्या जमिनीवर शेकडो कोटींचे प्रकल्प तुमच्या मुलाने उभे केले, त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करतंय. तपासाला आता सुरुवात झाली आहे. अनेक घोटाळे बाहेर येतील,” असं राऊत म्हणाले.


हेही वाचा – न्यायव्यवस्थेने बांधलेल्या काळ्या पट्टीला छिद्र, त्यातून आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहते; राऊतांचं गंभीर वक्तव्य


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -