घरताज्या घडामोडीElon Musk : एलन मस्क ट्विटरवर करणार कब्जा, कंपनीकडून ४१ अब्ज डॉलर्सची...

Elon Musk : एलन मस्क ट्विटरवर करणार कब्जा, कंपनीकडून ४१ अब्ज डॉलर्सची ऑफर

Subscribe

टेस्लाचे सीईओ यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर त्यांना संचालक मंडळात सहभागी होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, एलन मस्क यांनीच ही ऑफर नाकारल्याची माहिती ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी दिली. मस्क यांनी ट्विटरची संपूर्ण मालकी मिळवण्यासाठी कंपनीला ४१ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. प्रतिशेअर ५४.२० डॉलर मोजण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

एलन मस्क यांच्या ऑफरचे वृत्त आल्यानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात मस्क यांनी म्हटलंय की, मी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली आहे. कारण मला विश्वास आहे की, त्यात भाषण स्वातंत्र्यासाठी एक जागतिक व्यासपीठ बनण्याची क्षमता आहे. परंतु कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर प्रामुख्याने माझ्या लक्षात आले की, सध्याच्या चौकटीत काम केल्यास कंपनीची भरभराट होणे अशक्य आहे. तसेच कंपनी सध्याच्या स्वरूपात गराज पूर्ण शकणार नाही किंवा पूर्णही करणार नाही.

- Advertisement -

ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता असून त्याला वाव देण्याची गरज आहे. माझ्याकडे कंपनीसाठी चांगली ऑफर आहे. मात्र, कंपनीने या ऑफरचा विचार न केल्यास मी ट्विटरमधील माझ्या गुंतवणुकीबाबत फेरविचार करेन, असा इशारादेखील मस्क यांनी पत्रातून दिला आहे.

काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरबाबत मोठा निर्णय घेतला होता. ते स्वत: ट्विटर बोर्डात सामील होणार नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसेच याबाबत ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करत यासंबंधीत माहिती दिली. बोर्डात सामील होण्याबाबत त्यांची आणि कंपनीच्या बोर्डाची एलन मस्कसोबत चर्चा झाली आहे.

- Advertisement -

आम्ही सहयोग करण्यासह व्यवसायातील रिस्क फॅक्टरबद्दल उत्सुक आहोत. एलन मस्क हे स्वत: इतर सर्व बोर्ड सदस्यांप्रमाणेच कंपनीचे सदस्य होतील असा आमचा विश्वास होता. तसेच त्यांनी कंपनीच्या आणि आमच्या सर्व भागधारकांच्या हितासाठी काम केलं पाहीजे अशी अपेक्षा होती, असं अग्रवाल यांनी म्हटलं.


हेही वाचा : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची अशी आहे लाईफस्टाईल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -