घरदेश-विदेशSanjay Raut : "उद्योगपतींना लाभ मिळवून देणे भाजपचा गोरखधंदा", संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut : “उद्योगपतींना लाभ मिळवून देणे भाजपचा गोरखधंदा”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Subscribe

शिवसेनेच्या अधिवेशनात भाजपाचा अभिनंदनाचा ठराव. तुम्ही शिवसेना कोणाच्या पायाशी बांधून ठेवली? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला केला आहे.

मुंबई : इलेक्टोरल बॉण्ड्स निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. इलेक्टोरल बॉण्ड ही योजना घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणुकीतील काळा पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्टोरल बॉण्ड्स हा एकमेव मार्ग नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. संजय राऊत यांनी इलेक्टरोल बॉण्ड्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांना वांद्रेतील एमएसआरडीची जागा मिळणार आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले,”गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत. इलेक्टोरल बॉण्ड्सवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे आणि ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स घेऊन भाजपाची तिजोरी भरली आहे. त्यांची नावे जाहीर करा, ही सूचना किंवा आदेश सर्वोच्चन न्यायालयाने दिले आहेत. त्यात गौतम अदानींचे नाव सर्वात प्रथम आहे, मला खात्री आहे. अशा प्रकारचे आपल्या उद्योगपतींना ठेके द्याचे द्यायचे आणि त्या बदल्या शेकडो कोटीचे इलेक्टोरल बॉण्ड्स निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये भाजपाच्या तिजोरीत आज जमा झाले आहेत आमच्याकडे नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्यांकडे नाहीत, त्यांच्याकडे आहे. मीठाघराची जमीन अदानींना,धारावी, वांद्रे रिक्लेमेशन भूखंड”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी गौदम अदानी यांच्यावर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chiplun : ठाकरे गट आणि भाजपामधील राड्यानंतर फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले…

महाराष्ट्राच्या संस्कृतीवर नशेच्या, दारूच्या गुळण्या

महाराष्ट्राचा राजकीय संस्कृतीची दर्जा घसला आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “भाजपामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार पूर्णपणे बिघडले आहेत. भाजपाने चिखलफेक करण्यासाठी काही टोळ्यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्राला जी थोर परंपरा होती. पुरोगामी महाराष्ट्रा एक राजकीय संस्कृती होती. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या दारूच्या अनैकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपाने काही भाडोत्री लोकांकडून सुरू केले आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Dhangar Reservation : फडणवीसांनी धनगर समाजाला दिलेल्या शब्दाचे काय झाले? अनिल देशमुखांचा सवाल

शिवसेनेच्या अधिवेशनात भाजपाचा अभिनंदनाचा ठराव

शिवसेनेच्या अधिवेशनात भाजपाच्या नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव. पण स्वत:ला शिवसेना म्हणणारे डुप्लीकेट लोक अधिवेशन घेतता आणि कोल्हापुरच्या अधिवेशनात ठराव काय करतात तर भाजपाच्या अभिनंदनाचा ठराव, तुम्ही शिवसेना कोणाच्या पायाशी बांधून ठेवली? असा सवाल संजय राऊत यांनी शिंदे गटाला केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -