घरमहाराष्ट्रSanjay Raut : घटना बदलण्यासाठी भाजपाला बहुमत हवे, राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : घटना बदलण्यासाठी भाजपाला बहुमत हवे, राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

'अब की बार भाजपा 400 पार' असा नारा भाजपाकडून देण्यात आला आहे. परंतु, त्यांच्या या नाऱ्यावर आता विरोधकांकडून निशाणा साधण्यात आला आहे.

मुंबई : ‘अब की बार भाजपा 400 पार’ असा नारा भाजपाकडून देण्यात आला आहे. परंतु, त्यांच्या या नाऱ्यावर आता विरोधकांकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाला देशाचे संविधान बदलण्यासाठी बहुमत हवे आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर, ईडी म्हणजे भाजपाची हप्ता वसुली एजंट आहे, अशी टीकाही राऊतांकडून करण्यात आली आहे. (Sanjay Raut serious accusation that BJP needs a majority to change the situation)

हेही वाचा… Ambadas Danve : मी नाराज नाही, पण…; लोकसभा लढवण्याची अंबादास दानवेंची इच्छा

- Advertisement -

आजच्या पत्रकार परिषदेत बोलतान संजय राऊत म्हणाले की, हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे. पण ज्या पद्धतीचा इलेक्टोरल बॉण्डच्या भ्रष्टाचाराचा घोटाळा समोर आलेला आहे आणि तो फक्त शहरापुरता मर्यादित नाही, तर गावाच्या शेवटच्या माणसांपर्यंत फक्त मी खाणार, हा मॅसेज गेला आहे. मी आणि माझ्या लोकांना खाता यावे, यासाठी दरोडा टाकू चोरी करू, काहीही करू असा पंतप्रधान मोदींचा मॅसेज गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आहे. त्याच्यामुळे मोदींचे भ्रष्ट सरकार पुन्हा येणार नाही. हे सरकार म्हणजे देशाला लागलेला कलंक आहे आणि कलंक पुसावा लागणार आहे, असेही राऊतांकडून सांगण्यात आले.

तर, भाजपाने दिलेला 400 पारचा नारा हा तसा नाही, तर भाजपा तडीपार असा आहे. कारण त्यांनी तशी घोषणा केलेली असली तरी, इलेक्टोरल बॉण्डच्या घोटाळ्यामुळे ते शक्य नाही. कारण ज्यांना ज्यांना धंदा दिला, त्या सर्वांकडून चंदा घेतला आहे. यापेक्षा मोठा घोटाळा देशाच्या इतिहासात झालेला नाही. जर का कोणत्या इतर देशात हा घोटाळा झाला असता तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता. पण आता तिसऱ्यांदा त्यांचे सरकार येणार नाही. संविधान बदलण्याचा त्यांचा कट आहे, म्हणूनच तर त्यांना 400 पेक्षा अधिक जागांचे बहुमत हवे आहे. कारण संविधान बदलल्यानंतर ते भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे नाव देतील, असा थेट आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच, ज्याप्रमाणे महात्मा गांधी ‘फादर ऑफ नेशन’ आहेत, त्याचप्रमाणे ‘मोदी फादर ऑफ करप्शन आहेत’ असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -