घरमहाराष्ट्रSanjay Raut : अरे, कोण भारतीय जनता पक्ष? कोण नरेंद्र मोदी? अधिवेशनात...

Sanjay Raut : अरे, कोण भारतीय जनता पक्ष? कोण नरेंद्र मोदी? अधिवेशनात संजय राऊत कडाडले

Subscribe

रामकथेच्या माध्यमातून उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, वालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती. आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता हे डोक्यातून काढा. विजय आपला आहे.

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये सुरू झाले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या संबोधनातून भाजपवर जोरदार टीका केली. उपस्थितांना रामकथा सांगून कोण भारतीय जनता पक्ष? कोण नरेंद्र मोदी? असे म्हणत विरोधकांना हरवायचे असेल त्यांचा आत्मविश्वास कमी करा असा सल्ला शिवसैनिकांना दिला. (Sanjay Raut Who is Bharatiya Janata Party Who is Narendra Modi Sanjay Raut was bitter in the session)

रामकथेच्या माध्यमातून उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, वालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती. आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे रावण अजिंक्य होता हे डोक्यातून काढा. विजय आपलाच आहे. आपण जिंकणार हे नाशिकमधलं मी सांगितलेलं सत्य आहे. ते सत्य होणार आहे कारण मी रामभक्त आहे. असे म्हणतच उद्धव ठाकरेंना उद्देशून खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रभूना (उद्धव ठाकरे) खरं वाटणार नाही. माझ्या पाठीशी प्रभू आहेत पण मी रामभक्त आहे असे म्हणताच संपूर्ण सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

- Advertisement -

हेही वाचा : Sanjay Raut : शिवसेना नसती तर अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठाच… संजय राऊतांचा हल्लाबोल

हनुमानाने रावणाचा आत्मविश्वास कमी केला

राम कथा सांगताना खासदार संजय राऊत म्हणाले की, बजरंगबली, हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोहचला. तेव्हा हनुमानाला अटक झाली. रावणाचे सैनिक त्यांना जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले. रावण हसला आणि म्हणाला ‘काय रे वानरा, मला ओळखत नाहीस’ ‘तुझी हिम्मत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची? याला उत्तर देत हनुमान म्हणाले की, अरे, मी तुला ओळखतो ना? अरे, तू तोच ना? ज्याला वालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि तुझी धिंड काढली होती. त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला. हे मी यासाठी सांगतोय की, हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा आत्मविश्वास कमी करायचां होता. तेव्हा शत्रूचा आत्मविश्वास आधी कमी केला पाहिजे. अरे, कोण भारतीय जनता पक्ष? कोण नरेंद्र मोदी? कोण देवेंद्र फडणवीस? कोण अजित पवार? कोण एकनाथ शिंदे? आपण सगळ्यांना हारवू शकू असेही खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -