घरमहाराष्ट्र"राम मंदिराचे मंगल कार्यालय करून ठेवले", Sanjay Raut यांची भाजपावर घणाघाती टीका

“राम मंदिराचे मंगल कार्यालय करून ठेवले”, Sanjay Raut यांची भाजपावर घणाघाती टीका

Subscribe

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी केंद्र सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी हजारो लोकांना निमंत्रण देण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी करण्यात येणारी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर सरकारकडून आता अनेकांना निमंत्रणही पाठवण्यात आले आहे. या निमंत्रणावरून आता राजकीय वाद पेटला आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांनाही याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पण या सोहळ्यावरून आता ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. राम मंदिराचा सोहळा हा धार्मिक नाही पण सांस्कृतिक सोहळा आहे. पण यांनी म्हणजेच भाजपाच्या सरकारने या सोहळ्याला लग्नाप्रमाणे निमंत्रण वाटून त्याचे मंगल कार्यालय करून ठेवले आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut’s scathing criticism of BJP, “Ram Mandir kept Mangal office”.)

हेही वाचा… Supriya Sule : ‘माझ शंभरवेळा निलंबन केलं तरी…’सुप्रिया सुळे यांचा सरकारवर टीका

- Advertisement -

प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना राम मंदिराच्या सोहळ्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राम मंदिराचा सोहळा हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यात आम्ही बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत. सध्या राम मंदिराचा सोहळा फक्त भाजपाचा झाला आहे. तो देशाचा व्हायला हवा. हा फक्त धार्मिक सोहळा नसून देशाचा सांस्कृतिक सोहळा आहे, मात्र भाजपाने त्याला राजकीय सोहळा करून टाकला. स्वतःच्या घरातील मुंज, लग्नाचे निमंत्रण देतात, तशा पदधतीने भाजपाचे लोक निमंत्रण देत आहेत. जणू काय राम मंदिराचे यांनी मंगल कार्यालय करून ठेवले आहे. प्रभू श्रीराम सर्व पाहत आहेत. हा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. राम मंदिरासाठी असंख्य शिवसेनेने त्याग केलेला आहे. त्याला आम्हाला आता कोणतेही गालबोट लावायचे नाही. पण योग्यवेळी आम्ही बोलू, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याबाबत होणाऱ्या फोडाफोडीच्या राजकारणावरही आपले मत व्यक्त केले आहे. नव्या वर्षात राज्य सरकार जुनी ओझी घेऊन चालले आहे. बेरोजगारी, महागाई,
शेतकऱ्यांच्या मालाला नसलेले भाव हेच प्रश्न पुढच्या वर्षी ही कायम राहणार आहेत. मागच्या दीड वर्षात या सरकारने आमदार, पदाधिकाऱ्यांचे भाव वाढविले. पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कधी वाढविणार? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच होती, त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, या सर्व प्रश्नांवरचा आक्रोश खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांन आक्रोष मोर्चातून मांडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -