घरमहाराष्ट्रSanjay Shirsat : ...अन्यथा महायुतीत फूट पडायला वेळ लागणार नाही, संजय...

Sanjay Shirsat : …अन्यथा महायुतीत फूट पडायला वेळ लागणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य

Subscribe

संजय शिरसाट : आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. महायुती सरकारकडून जागा वाटपासंर्भात चर्ची सुरू आहे. तीन पक्ष एकत्र आलेल्या महायुतीला जागावाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. दरम्यान शिंदे गट आणि अजित पावर गटामध्ये तणाव असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून ओढाताण सुरू आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जागावाटपावर बाबत भाष्य केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाचे जेवढे आमदार महायुतीत आले, तेवढेच आमचेही आमदार आले आहेत. त्यामुळे जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील, तेवढ्या जागा अजित पवार गटाला मिळायला पाहिजे. असं भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटातील आमदार संजय शिसाट यांनी भुजबळांना सल्ला दिला आहे. शिरसाट म्हणाले की, भुजबळांना आता वेळ मिळाल्या नंतर ते महायुती सरकारवर बोलत आहेत. भुजबळ हे ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांनी अशी विधानं करू नयेत. छगन भुजबळ यांनी आपली मते त्यांच्या नेत्याकडं व्यक्त करावं. सर्व गोष्टी सार्वजनिक केली, तर त्याचे काय परिणाम होतात, हे छगन भुजबळांना माहिती आहे. त्यामुळे युती होण्यापूर्वी भुजबळांनी अशी विधान करणं चुकीचं आहे. आमच्यासारख्यांनी विरोधात वक्तव्य केलं, तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही. असं संजय शिरसाट म्हणाले.

अजित पवार गटाचे नेते भुजबळ म्हणाले की, शिंदे गटाचे जेवढे आमदार आलेत, तेवढेच आमदार अजित पवार गटाचे आमदार आले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला देखील तेवढ्याच जागा मिळाल्या पाहिजेत. अजित पवार आमच्या पक्षाचे प्रमुष आहेत. जागावाटपा बाबत अजित पवारांनी आपलं मतं मांडलं आहे असं भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

त्यामुळे आता अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला किती जागा मिळत आहेत हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -