घररायगडSindhudurg News : नगरपंचायतीच्या मागणीसाठी पत्रकारांचे आंदोलन; घोषणांनी दणाणला परिसर

Sindhudurg News : नगरपंचायतीच्या मागणीसाठी पत्रकारांचे आंदोलन; घोषणांनी दणाणला परिसर

Subscribe

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने बुधवारी (27 डिसेंबर) धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या तिन्ही गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने बुधवारी (27 डिसेंबर) धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या तिन्ही गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस (दोन्ही गट) पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत झाल्याशिवाय गप्प न बसण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन देवून आंदोलनांची सांगता करण्यात आली. (Sindhudurg News Journalists agitation for the demand of Nagar Panchayat The area was filled with announcements)

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, सचिव लवू म्हाडेश्वर, गिरीश परब, विनोद परब, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, गणेश जेठे, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, मनोज वारंग, सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर आदी पत्रकार संघ सभासद उपस्थित होते. यावेळी गुरुप्रसाद दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अजित पवार राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, पत्रकार समिती जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, शेखर सामंत, राजन चव्हाण, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, भाई सावंत, उद्योजक संतोष कदम, रुपेश पावसकर, ओरोस उपसरपंच गौरव घाडीगावकर, दादा साईल, ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत, सुनील पाटकर, उल्हास मेस्त्री, सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण अध्यक्ष अशोक रासम, अशोक कदम, माजी सभापती अंकुश जाधव, अणाव पोलीस पाटील सुनील पाटकर आदींनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला.

- Advertisement -

हेही वाचा : WFI : कुस्ती महासंघाच्या कारभारावर त्रिसदस्यीय समितीचा वॉच; ऑलिम्पिक असोसिएशनचा निर्णय

लढा सुरुच राहणार- संदीप गावडे

नगर पंचायत होण्यासाठी आम्ही केलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय, सर्व स्तरातील नागरिक यांचा पाठिंबा मिळाल्याने हे आंदोलन यशस्वी झाले आहे. आता आम्हाला थाबायचे नाही. 26 जानेवारीपर्यंत याबाबत हालचाली दिसल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याची तयारी आम्ही केली. त्यामुळे जोपर्यंत सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी आंदोलनाची भूमिका सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी स्पष्ट केली.

Sindhudurg News : नगरपंचायतीच्या मागणीसाठी पत्रकारांचे आंदोलन; घोषणांनी दणाणला परिसर
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -