घरमहाराष्ट्रशहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता

शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता

Subscribe

शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची तक्रार

शनिवारी सकाळी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीला हजर राहिलेले शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा हे अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आमदार दरोडा यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबिय भयभीत झाले आहेत त्यांना आर्थिक अमिष देऊन भाजपाने गळाला लावले काय ?अशा उलट सुलट चर्चेला एकच उधाण आले आहे .

शनिवारी दिवसभर चालू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यमय राजकीय खेळीला एक नवीन वळण लागले आहे. अजित पवार यांच्या संपर्कात असलेल्या महाराष्ट्रातील ११ आमदारांमध्ये शहापूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा समावेश होता. भाजप- राष्ट्रवादीच्या शपथविधी सोहळ्यासाठी दरोडा उपस्थित राहिले होते. यावेळी मुंबईत दरोडा यांचे चिरंजीव करण हे त्यांच्या सोबत सकाळी होते. मात्र शपथविधीला जाताना राजभवनाच्या वाटेवर करण यास अडविण्यात आले. त्यानंतर आपला वडिलांशी संपर्क तुटला. त्यांचा फोन स्विच ऑफ येत असल्याची प्रतिक्रिया करण यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. दरोडांच्या पत्नीने देखील फोन करण्याचा वारंवार संपर्क केला. मात्र फोन लागत नसल्याने आमदार दरोडांचे कुटुंबिय प्रचंड अस्वस्थ झाले असून शहापूर विधानसभेत या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरोडा यांना भाजपने गळाला लावल्याची जोरदार चर्चा दिवसभर सोशल मीडीयावर सुरु होती दरम्यान या प्रकरणी शहापूरचे शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे मतदार संघातून गायब झाले असून दरोडा बेपत्ता झाल्याची लेखी तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -