घरठाणेमुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाचे बुलडोझर; दोन्ही गट आमनेसामने

मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाचे बुलडोझर; दोन्ही गट आमनेसामने

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात शिवसेनेच्या शाखेवरून पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे- ठाकरे गटात राडा झाला आहे.

ठाणे : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता शिवसेनेच्या शाखांच्या मालकी हक्कावरून दोन्ही गट पुन्हा एकदा आमनेसामने येत असल्याचे दिसून येत आहे. या कारण ठरले ते मुब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेचे. मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने बुलडोझर चालवून ती शाखा भूईसपाट केली असून, आता त्या ठिकाणी मोठी इमारत उभारली जाणार आहे. (Shinde faction bulldozes on Thackeray faction branch in Mumbra Both groups face each other)

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात शिवसेनेच्या शाखेवरून पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे- ठाकरे गटात राडा झाला आहे. कारण, ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शाखा शिंदे गटाने मिळवत त्यावर बुलडोझर चालवून ती उद्ध्वस्त केली आणि त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करणार असल्याचे स्पष्ट केलं. यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : WORLD CUP 2023 : गुणतालिकेत टीम इंडिया पुन्हा नंबर वन; इतर संघाची काय स्थिती? वाचा-

राजन किणे यांच्या नेतृत्वात शाखेत घुसले शिंदे गटाचे समर्थक

राज्यात मराठा आरक्षणावरून घडामोडी घडत असतानाच गुरुवारी (2 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले राजन किणे यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांचा जमाव ठाकरे गटाच्या शाखेत घुसला. यावेळी त्यांनी शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढले. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केला.

- Advertisement -

हेही वाचा : Eknath Shinde : साखळी उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन; आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार

धूळखात पडली होती शाखा

या घटनेनंतर शिंदे गटातील नेते राजन किणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आनंद दिघे यांच्या काळात ही शाखा रस्ता रुंदीकरण झाल्याने या ठिकाणी आमच्या सहकार्याने बनवली होती. मात्र, आता याची दुरवस्था झाली आहे. वर्षातून काहीच दिवस ही शाखा उघडली जात असल्याने शिवसैनिकाना हे बघविल्या गेले नाही. धूळखात पडली होती. मात्र शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी घोषित झाल्याने आमच्या हक्काच्या शाखेत प्रवेश केला आहे. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे राजन किणे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -