घरताज्या घडामोडीकोकणात शिंदे गट ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

कोकणात शिंदे गट ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

Subscribe

राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय वर्चस्वासाठी लढाई सुरू झाली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सत्तांतर झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कुणीही शिंदेंसोबत गेले नव्हते. परंतु रत्नागिरी येथील ठाकरे गटाच्या लांजा नगरपंचायतीतील नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी मोठी भूमिका बजावली होती. दरम्यान, कोकणात शिंदे गट पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघा़डीतील काँग्रेसमधील नगरसेवकांच्या साथीने शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. १० एप्रिल रोजी मांडलेल्या या ठरावावर आज मतदान होणार आहे. त्यामुळे या अविश्वासाच्या ठरावाचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने देणार?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासह १२ नगरसेवक हे अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. विश्वास ठरावादरम्यान होणारी संभाव्य फाटाफूट या गोष्टी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या या ठिकाणी राजन साळवी आमदार आहेत. याशिवाय, विनायक राऊत खासदार आहेत. आमदार म्हणून राजन साळवी यांची पकड मजबूत आहे. परंतु अविश्वास ठराव ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यास आमदार राजन साळवी यांना धक्का मानला जाऊ शकतो. त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने येणार?, याकडं सर्वांचं लक्ष लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रवादीचा कल भाजपाकडे, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -