Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र होय हे वेड्यांचंच सरकार, आम्हाला...; गोगावलेंचं विरोधकांना चोख प्रत्युत्तर

होय हे वेड्यांचंच सरकार, आम्हाला…; गोगावलेंचं विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Subscribe

हे सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहेत, ते काही जणांना बघवत नाही म्हणून हे वेड्यांचंच सरकार आहे. परंतु हे वेड आहे कामाचं. घरी बसण्याचं वेड नाही, असं म्हणत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारला वेड्यांचं सरकार आहे, असं म्हटलं होतं. यावर आता शिंदे गटाचे आमदार, भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोगावले म्हणाले की, सरकार वेगानं काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे ज्या पद्धतीनं काम करत आहेत, ते काही जणांना बघवत नाही म्हणून हे वेड्यांचंच सरकार आहे. परंतु हे वेड आहे कामाचं. घरी बसण्याचं वेड हे आमच्या सरकारला नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कामानं झपाटलेले आहेत. त्यामुळे आता विरोधकांनी वेड लागण्याची वेळ आलेली आहे. आता आपण करायचं काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर येतो म्हणून ते कदाचित असे चुकीचे शब्द वापरतात, असं गोगावले म्हणाले. (Shinde group leader Bharat Gogawale given answer to Sanjay Raut)

मागच्या दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भरत गोगावलेंनी मंत्रीपद वाटपावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गोगावले म्हणाले की, ते परवा मी सांगितलं आहे. आता उगाच शिळ्या कढीला ऊत देऊ नका. त्या दिवशी जे झालं, त्याचा विपर्यास केला गेला. माझा सहकारी मित्र आहे. आम्ही दोघं सकाळी सोबत होतो. आम्ही एकमेंकाचं दु:ख वाटून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी आमच्यात सहभाग घेतला. आम्हाला समजावरलं आणि आम्ही समजलो, असं गोगावले म्हणाले.

नाराज असतो तर इथे आलो नसतो

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असल्याची चर्चा असताना त्यावरही गोगावलेंनी उत्तर दिलं आहे. आता जो होईल तो विस्तार व्यवस्थित होईल. काही कारणास्तव तो थांबला आहे. माझ्या नाराजीच्या चर्चा आहेत. पण तसं काहीही नाही आहे. आम्ही नाराज असतो तर मंत्रालयात आलोच नसतो. ठीक आहे. सबुरीचं फळ गोड असतं, असंही गोगावलेंची नमूद केलं.

( हेही वाचा: Senate Election : विद्यापीठाला नेमकी भीती कोणाची? अमित ठाकरेंचा राज्यपालांना सवाल )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -