घरमहाराष्ट्रचक्क शौचालयात धुतली जातायेत 'शिवभोजन थाळी'ची भांडी; सरकारचे चौकशीचे आदेश

चक्क शौचालयात धुतली जातायेत ‘शिवभोजन थाळी’ची भांडी; सरकारचे चौकशीचे आदेश

Subscribe

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ठाकरे सरकारनं 'शिवभोजन' योजना सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात जेवण उपलब्ध करुन दिली जात आहे.

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ठाकरे सरकारनं ‘शिवभोजन’ योजना सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात जेवण उपलब्ध करुन दिली जात आहे. मात्र, आता याच शिवभोजन थाळीबाबत यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले.

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रात भांडी चक्क शौचालयात धुतल्या जात आहेत. या संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान जेवणाची भांडी शौचालयात धुतली जात असल्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या शिवभोजन केंद्र चालकावर जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने काय कारवाई केली जाते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाचे चौकशीचे आदेश

शिवभोजन योजना ही महाविकास आघाडी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. हा नेमका काय प्रकार आहे या संदर्भात सखोल चौकशी करावी असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. तसंच या संदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावा असेही आदेश देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘अभ्यासक्रम पूर्ण झाल्यास शाळा सुरू ठेवू नये’; शिक्षण विभागाचा विद्यार्थी, पालकांना दिलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -