घरमहाराष्ट्रसत्तार की गद्दार?

सत्तार की गद्दार?

Subscribe

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे राजीनामा देणार असल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून सुरु होती. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. मी राजीनामा दिला अशा पुड्या कुणीतरी सोडल्या आहेत. मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच माध्यमांना सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे, अशी भूमिका सत्तार यांनी मांडली आहे. तसेच माझ्या राजीनाम्याची अफवा सोडणार्‍यांना जाऊन प्रश्न का विचारत नाही, असा प्रतिप्रश्नही त्यांनी माध्यमांना केला. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची शनिवारी निवडणूक होती.

त्याधीच सकाळी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेने अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे वारंवार खंडन केले. मात्र सत्तार यांची प्रतिक्रिया दिवसभरात मिळाली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, जिल्हा परिषदेतील सत्तार गटाच्या सदस्यांनी भाजपला मतदान केले आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. त्यानंतर सत्तारांच्या राजीनाम्यावर सकाळपासून राजकारण सुरु झाले होते. विरोधकांनीदेखील यावरुन महाराष्ट्र विकास आघाडीवर टीका केली.

- Advertisement -

या सर्व टीकेला अब्दुल सत्तार यांनी तब्बल आठ तासानंतर उत्तर देत आपण राजीनामा दिला नसल्याचे सांगताना या फक्त पुड्या होत्या, असे स्पष्ट केले आहे. तर मी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. मात्र, त्याआधी मी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती देणार असल्याचे सांगत माझ्यावर मातोश्रीचा कंट्रोल असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या आहेत. ज्यांनी ह्या बातम्या दिल्या त्यांनाच विचारा की मी राजीनामा दिला की नाही, असेही सत्तार यांनी म्हटले.

फडणवीसांचे हेर,खैरेंचा हल्लाबोल
अब्दुल सत्तार हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे हेर आहेत. महाविकास आघाडीचे मंत्री असूनही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. या हिरव्या सापाला पवित्र ’मातोश्री’ची पायरी उध्दवजींनी चढू द्यायला नको, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -