घरठाणेअजित पवार सत्तेत आल्यामुळे शिवसेनेचे आमदार, मंत्री अस्वस्थ! मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली नाराजी

अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिवसेनेचे आमदार, मंत्री अस्वस्थ! मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली नाराजी

Subscribe

ठाणे : शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra politics) गेल्या दोन दिवसांपासून चांगलंच ढवळून निघालं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासह पक्षातील इतर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिवसेनेच्या काही आमदार आणि मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांनी सोमवारी (3 जुलै) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं कारण देत बाहेर पडलेल्या सेना आमदारांना ठाकरे गटाकडून जुने व्हिडिओ शेअर करुन प्रश्न विचारले जात आहेत. (Shiv Sena MLAs Ministers are upset because Ajit Pawar came to power Expressed displeasure before the Chief Minister)

हेही वाचा – #NCPBreaksUp : शरद पवारांचा मोठा निर्णय; दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी ‘या’ विश्वासू नेत्याकडे

- Advertisement -

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले जुने वाद आणि मतभेदाचे काय? असा प्रश्न आमदार आणि मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित केला आहे. यानंतर एकनाथ शिंदे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असला तरी येत्या काळात महत्त्वपूर्ण निर्णय घेताना नाराजीनाट्य पाहायला मिळणार आहे.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यात टेंभीनाका येथील आनंदाश्रमात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करण्यासाठी दुपारी येणार होते. मात्र त्याआधी शिवसेनेच्या काही आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आपली नाराजी जाहीर केली. या बैठकीला मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संदीपान भूमरे, दादा भुसे, आमदार संजय शिरसाट, संजय बांगर, प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी रायगड, नाशिक, सातारा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये तीव्र मतभेद असल्याचे सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांमधील जुने वाद पुन्हा होण्याची शक्यता या आमदार आणि मंत्र्यांनी वर्तविली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नितीन गडकरींची तब्येत पुन्हा बिघडली; ‘या’ त्रासामुळे पंतप्रधान मोदींची बैठक अर्धवट सोडली

सरकारमध्ये मित्रपक्ष घेण्याचा निर्णय वरिष्ठांचा, आम्ही नाराज नाही

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शुक्रवारी (30 जून) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर रविवारी (1 जुलै) राष्ट्रवादीमध्ये बंड करत शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सामील झाले. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे -पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी नाराजीनाट्य असल्याचे बोलले जात असले तरी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई नाराज नसल्याचे बोलेल आहे. ते म्हणाले की, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचे आणि आमचे पूर्वीचे धोरण नक्कीच बदलेल. त्यामुळे नवीन धोरण आणि सूत्राप्रमाणे सर्व पुढे जाऊ. सरकारमध्ये तिसरा मित्रपक्ष घेण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला त्यामुळे आम्ही त्याबद्दल नाराज नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -