घरमहाराष्ट्र१२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी भाजपा आक्रमक, नागपुर, पुण्यात जोरदार निदर्शने

१२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी भाजपा आक्रमक, नागपुर, पुण्यात जोरदार निदर्शने

Subscribe

ठाकरे सरकारची जुलूमशाही, हुकूमशाही- चंद्रशेखर बावनकुळे

विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले. यानिषेधार्थ राज्यातील अनके भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन पुकरले आहे. पुणे, नागपूर जिल्ह्यात भाजपाच्या आक्रमक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची जाळफोळ करत ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. पुणे, नागपूर भागांत ठिकठिकाणी भाजपाने निदर्शने करत असून आज हजारो कार्यकर्ते सरकारचा निषेध नोंदवत आहेत. या हजारो भाजपा कार्यकर्त्यांकडून ठाकरे सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलन सुरु आहे.

नागपूरच्या बडकस चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्त्वात नागपूरात भाजपाचे आंदोलन सुरु आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारचा पुतळा जाळण्यात आला. हजारो आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र शब्दांत सरकारविरोधात निषेध केला, या आंदोलनामुळे बडकस चौकातील वाहतुकीवरही परिणाम झाला. परंतु या भाजपा आमदारांचे निलंबन जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन सुरु राहिल असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
तर दुसरीकडे पुणे, मुंबईतही अनेक भाजपा कार्यकर्त्यांना हातात ठाकरे सरकारविरोधातील फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

- Advertisement -

ठाकरे सरकारची जुलूमशाही, हुकूमशाही- चंद्रशेखर बावनकुळे

राज्य सरकारने विधानमंडळाचा वापर करत जुलूमशाही, हुकूमशाही करून १२ आमदारांना निलंबित केले. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला जातोयं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या १२ आमंदारांना परत घेत नाहीत तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -