घरमहाराष्ट्र'माझ्या पोराप्रमाणं तू पण शेतकऱ्यांना धरून राहा'; शेट्टींच्या आईचा खासदार मानेंना सल्ला

‘माझ्या पोराप्रमाणं तू पण शेतकऱ्यांना धरून राहा’; शेट्टींच्या आईचा खासदार मानेंना सल्ला

Subscribe

राज्यात चर्चेच्या ठरलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव करून विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार आणि नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली.

राज्यात चर्चेच्या ठरलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव करून विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार आणि नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी आज, बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्या मातोश्रींचे आशीर्वादही घेतले. निवडून आल्यानंतर त्यांनी दाखवलेली खिलाडूवृत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे. ‘माझ्या पोराप्रमाणं तू पण शेतकऱ्यांना धरून राहा…, माझा आशीर्वाद लै मोठा हाय’, असे उद्गार यावेळी शेट्टी यांच्या आईने काढले. तर याला धैर्यशील माने यांनीही ‘तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच चांगलं होईल’, असे आश्वासन दिले.

- Advertisement -

निवडणुकीत प्रतिस्पर्धी, तरीही घेतली सदिच्छा भेट 

हातकणंगले मतदारसंघातून धक्कादायक निकाल देत विजयी झालेले शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाच पराभव करत विजय मिळवला आहे. पण निकाल लागल्यानंतर सर्व मतभेद विसरत धैर्यशील माने राजू शेट्टींच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. लोकसभा निवडणुकीदरम्यान नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचाराची मैदानं गाजवली होती. ‘धैर्यशील माने माझ्या नातवासारखे आहेत. जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा’, असा आशीर्वाद यावेळी राजू शेट्टींच्या आईंनी धैर्यशील माने यांना दिला. राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने माझ्या घरी आल्यामुळे खूप आनंद झाला. त्यांनी लोकसभेत चांगले प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रीया यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -