घरमहाराष्ट्रशिवसेना खान्देशातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार

शिवसेना खान्देशातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खान्देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. येत्या १५ फेब्रुवारीला शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे पाचोरा येथे सभा घेणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप दोघांमध्ये युती होणार का? याविषयीच्या चर्चांना उधान आले असतानाच आता शिवसेनेने एकला चलोची भूमिका घेतली आहे. शिवसेना आता खान्देशातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे १५ फेब्रुवारीला पाचोऱ्यामध्ये सभा घेणार आहेत. सोमवारी शिवसेनेचे सर्व खासदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत संभाव्य उमेदवारांची चर्चा झाली. त्याचबरोबर २०१४ च्या लोकसभा निवडणुकवेळी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेने निवडणूक लढवली नव्हती तेथील परिस्थितींचाही आढावा घेण्यात आला.

खान्देशात सध्या भाजपची सत्ता

सध्या खान्देशात भाजपची सत्ता आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव आणि धुळे या दोन्ही शहरांच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. दोन्ही शहरांच्या महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी या महापालिका निवडणुकांमध्ये कंबर कसली होती. मात्र, आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वत: १५ फेब्रुवारीला सभा घेणार आहेत. खान्देशात शिवसेनेचे नेतृत्व चांगले आहे. जळगावचे ग्रामीण आमदार गुलाबराव पाटील हे तेथील नामांकित आमदार आहेत. शिवाय, खान्देशात बाळासाहेबांचे अनेक चाहतेदेखील आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मोठा फायदा शिवसेनेला होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ राहणार – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -