घरमहाराष्ट्रCorona: लॉकडाऊनमुळे शिर्डीत दर्शन बंद! मात्र देणगी ऐकून व्हाल थक्क!

Corona: लॉकडाऊनमुळे शिर्डीत दर्शन बंद! मात्र देणगी ऐकून व्हाल थक्क!

Subscribe

साईंच्या दर्शनासाठी एकही भाविक आला नसला तरी साधारण दीड महिन्यांमध्ये २ कोटी ५३ लाखांचं दान साई बाबांच्या दान पेटीत जमा

कोरोनाचे थैमान वाढत असताना लॉकडाऊनचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र व्यापार, व्यवसाय ठप्प असून पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळं देखील नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक असणाऱ्या शिर्डीतील साई बाबांचे मंदिर लॉकडाऊनमुळे इतिहासात प्रथमच भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. याकाळात साईंच्या दर्शनासाठी एकही भाविक आला नसला तरी साधारण दीड महिन्यांमध्ये २ कोटी ५३ लाखांचं दान साई बाबांच्या दान पेटीत जमा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्च पासून भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने संस्थानातर्फे ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली होती. या दरम्यान भाविकांनी फक्त ऑनलाईन दर्शनच नाही तर ऑनलाईन भरभरून दान देखील दिले आहे. ऑनलाईन माध्यमातून साई बाबांच्या दानपेटीत अडीच कोटींचं दान संस्थानकडे जमा झाले आहे.

- Advertisement -

जगन्नाथपुरी रथ यात्रेवर २८४ वर्षांत पहिल्यांदाच आली ही वेळ!

साई बाबांच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर जगातील वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक येत असतात. त्यामुळे इतर वेळी मंदिराच्या दानपेटील कोट्यवधींचं दान येत असते. मात्र ऑनलाईन सुविधा असल्याने लोकं थेट देणगी खात्यात जमा करणं पसंत करू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -