घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाची पहिल्यांदा लस तयार करून चीन जगावर अधिराज्य करेल?

CoronaVirus: कोरोनाची पहिल्यांदा लस तयार करून चीन जगावर अधिराज्य करेल?

Subscribe

कोरोनावर मात करण्यासाठी चीननं पहिल्यांदा लस तयार केली तर चीन काय करू शकेल? याबाबत अमेरिकेच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लस तयार करत आहेत. दरम्यान पहिल्यांदा कोरोना विषाणूची लस चीननं तयार केली तर ते त्याचा आर्थिक फायदा करून घेतील, अशी भीती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. एकीकडे जगातील अनेक देश एकमेकांची माहिती सांगून कोरोनाच्या लसीवर काम करत आहेत. तर दुसरीकडे अमेरिका आणि चीन स्वतः लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. पॉलिटिकोच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की, चीनला हे माहिती आहे की, जो देश पाहिल्यांदा कोरोनाची लस तयार करेल तो जगावर अधिराज्य करेल.

पेंटागन आणि सीआईएचे माजी अधिकारी मॅट क्रोएनिग हे म्हणाले की, बऱ्याचदा चीनकडून केलेल्या मदतीमागे अनेक हेतू असतात. त्यामुळे चीन कोरोनाच्या लसीचा वापर त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि अमेरिकेला मागे ढकलण्यासाठी वापर करण्याची शक्यता आहे. चीननं एप्रिलमध्ये कोरोना विषाणूच्या लसीच्या चाचणीचा अहवाल चांगला आला असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

चीनमधून कोरोना विषाणू पसरला आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत चीननं अगोदरच कोरोनाची लस तयार करण्यास सुरुवात केली असेल. जगभरातून वुहान शहरामधून कोरोना विषाणू पसरल्यामुळे चीनवर अनेक प्रश्न उठवले जात आहेत. अशा परिस्थितीत चीननं पहिल्यांदा लस तयार केली तर इतर देशांना देऊन आपली प्रतिमा सुधारण्याचे काम करेल.

दरम्यान अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटीच्या अधिकाऱ्याचा असा विश्वास आहे की, आतापर्यंत चीनमध्ये लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते दुसऱ्याच्या वस्तू आणि संशोधन करण्याची पद्धत चोरण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

जर पहिल्यांदा लस तयार केली तर आर्थिक परिणाम दिसून येईल. असोसिएशन ऑफ अमेरिकन मेडिकल कॉलेजचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी रॉस मॅककिन्ने म्हणतात, कोरोनाची लस पहिल्यांदा तयार केली गेली तर तो देश लोकसंख्या पहिल्यांदा सुरक्षित ठेवले. यामुळे त्या देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उघडेल. दरम्यान जग चीननं तयार केलेल्या कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवले का?, असा प्रश्न सीआईच्या माजी अधिकारी मॅट क्रोएनिग यांनी उपस्थित केला आहे. अलीकडेच चीननं अनेक देशात गुणवत्ता चांगली नसलेली वैद्यकीय उपकरणं पाठवल्याचं समोर आलं आहे.


हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकेनं केली चीनची पोलखोल, कोरोनाबाबत लपवली होती माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -