घरमहाराष्ट्रकरोनाचा चोरट्यांनी घेतला धसका

करोनाचा चोरट्यांनी घेतला धसका

Subscribe

काही दिवसांत रेल्वेच्या गुन्ह्यांत लक्षणीय घट

मुंबई, गर्दीच्या वेळेस उपगनरीय लोकलमध्ये हातसफाई करणार्‍या चोरट्यांनीही आता करोनाचा प्रचंड धसका घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या विविध पोलीस ठाण्यांत दाखल होणार्‍या गुन्ह्यांत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. जवळपास 20 ते 25 गुन्हे कमी झाल्याचे काही अधिकारी खाजगीत सांगतात. करोनामुळे चोरट्यांनी चोरी करण्यापासून घरात राहणे पसंद केल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांत करोना विषाणूमुळे संशयित रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घरातून मास्क लावून बाहेर पडावे, जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत होते. उपनगरीय लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या तिन्ही माार्गांवर दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पर्स, पाकिट, लॅपटॉप, मोबाईल आणि कॅश चोरी करणार्‍या अनेक टोळ्या रेल्वेमध्ये सक्रिय आहेत. अशा काही गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करीत असले तरी त्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही.

- Advertisement -

दररोज रेल्वेच्या विविध पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरी, मोबाईल, बॅग, पर्स, पाकीट आणि लॅपटॉप चोरीसह कॅश चोरीच्या शंभरच्या आसपास अधिक गुन्ह्यांची नोंद होती. त्यात मोबाईल चोरीचे साठ ते सत्तरहून अधिक गुन्ह्यांची नोंद होते. मात्र या गुन्ह्यांत गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. करोनामुळे एकीकडे प्रवाशांची गर्दी कमी झाली आणि दुसरीकडे चोरट्यांनी चोरी करण्यापासून काही दिवस विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत दाखल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी कमी असल्याचे काही अधिकारी खासगीत सांगतात.

चौपाट्यांवरच लवकरच कारवाई
करोनाच्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करताना रविवारी मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचा आदेश लागू केला होता. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईकरांना जुहू चौपाटीवर गर्दी करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली, तसेच तिथे येणार्‍या पर्यटकांसह इतरांना माघारी पाठविण्यात आले. जुहू आणि सांताक्रुज पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करताना यापुढे इतर चौपाट्यावर अशाच प्रकारे कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहे. करोनाचा वाढता प्रभाव पाहता येत्या काही दिवसांत मुंबईकरांनी जास्त अलर्ट राहण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनासह मनपा आणि इतर शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. रविवारी मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचा आदेश लागू करताना पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -