घरताज्या घडामोडीCorona Vaccination In Maharashtra : लसीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात तिसरा

Corona Vaccination In Maharashtra : लसीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात तिसरा

Subscribe

ओमीक्रोनचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज 1 हजार ऑक्सिजन बेड,70 व्हेंटिलेटर उपलब्ध,

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना लसीकरणामध्ये आघाडी घेत राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे , सध्या सिंधूदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे.ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, १ हजार ऑक्सिजन बेड व ७० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले आहेत. तर परदेशातून जिल्ह्यात आलेल्या ६५ नागरिकांपैकी २० जणांचे आलेले रिपोर्ट निगेटिव्ह आहेत इतरांनाही काही लक्षणे नसल्याने त्यांचेही ओमीक्रॉन रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतात, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी आमदार वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते .कोरोना लसीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप चांगले काम सुरु असून, राज्यात लसीकरणामध्ये तिसरा क्रमांक आहे मुंबई, पुणे नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली आहे ५ लाख ५५ हजार १६८ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ९२ टक्के लसीकरण झाले आहे. तर ३ लाख ७१ हजार ४४१ लोकांनी दुसरा डोस घेतला असून, ६१ टक्के लसीकरण झाले आहे. कोरोना आणि ओमीक्रॉनचा सामना करण्यासाठी कोरोना लसीकरण अत्यंत आवश्यक आहे डोंबिवली मध्ये जो ओमीक्रॉनचा रुग्ण आढळला त्यांच्या संपर्कात आलेल्या २० व्यक्ती निगेटिव्ह आल्या. त्यामुळे कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तर आपण कोरोना आणि ओमीक्रॉनचा सामना करू शकतो त्यामुळे लसीकरण वाढविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोना जवळजवळ हद्दपार झाला आहे. परंतु नव्याने ओमीक्रॉनचा विषाणू आला आहे. त्याचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. १ हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध केलेअसून त्यातील ८३२ बेड सरकारी रुग्णालयात आहेत. तसेच ७० व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध केले आहेत. तसेच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये २० टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या लोकांची तपासणी केली जात असून ६५ लोक परदेशातून आलेले आहेत त्यातील २० लोकांची आतापर्यंत कोरोना व ओमीक्रॉन चाचणी करण्यात आली असून सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तसेच इतर लोकांची तपासणी सुरू असून कुणालाही लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे तेही निगेटिव्हच येतील अशी अपेक्षा आहे तरीदेखील नागरिकांनी कोरोना किंवा ओमीक्रॉनचा धोका टाळण्यासाठी लस घ्यावी प्रसंगी आरोग्य यंत्रणेने घराघरात जाऊन लस द्यावी अशा सूचना देण्यात आल्याची माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.पंतप्रधान घरकुल आवास योजनेमध्ये मागच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर होता यावर्षीही पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची माहीती पालकमंत्री सामंत यानी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा – Omicron Variant: धारावीत ओमिक्रॉनची एंट्री! टान्झानियामधून आलेल्या प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -