घरमहाराष्ट्रदहावी निकाल : यंदा डोंबिवलीची ठाण्यावर बाजी

दहावी निकाल : यंदा डोंबिवलीची ठाण्यावर बाजी

Subscribe

यंदा दहावीच्या निकालात ठाणेची टक्केवारी घसरली असली तरी मात्र कल्याण – डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

यंदा ठाणे जिल्ह्यातील दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरला आहे. यंदा जिल्ह्यात ७८.५५ टक्के निकाल लागला असून गेल्यावर्षी उत्तीर्णांचे प्रमाण ९०.५१ टक्के होते. ठाणे जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एक लाख १५ हजार ६७३ विद्याार्थी बसले होते. त्यापैकी ९० हजार ८६५ विद्याार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेप्रमाणेच शालांत परीक्षेच्या निकालातही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. ४५ हजार ३४ मुले आणि ४५ हजार ८३१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर यंदा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राचा निकाल सर्वाधिक लागला असून कल्याण – डोंबिवलीतले ८३.८३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल

तर कल्याण ग्रामीणमधील ८३.०६ टक्के विद्याार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल २२.६४ टक्क्यांनी घसरला आहे. रिपिटर्स विभागाचा निकाल २८.५१ टक्के लागला आहे. यंदा जिल्ह्यातील पाच हजार १३८ विद्याार्थी पुन्हा परीक्षेला बसले होते. त्यापैकी  अवघे १ हजार ४६५ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

शहराच्या निकालातही घट 

गेल्या वर्षी ठाणे शहराचा निकालही  ८९. ९२ टक्के लागला होता. त्यात यंदाच्यावर्षी घरसण होत केवळ ७८.९५ टक्के निकाल लागला आहे. शहरातून २५ हजार ४५९ विद्याार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २० हजार १०० विद्याार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलीच सरस 

ठाणे जिल्ह्यातून ५४ हजार ६१८ मुली तर ६१ हजार ५५ मुले दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४५ हजार ८३१ मुली तर ४५ हजार ३४ मुले परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८३.९१ टक्के तर मुलांची टक्केवारी ७३.७६ टक्के आहे.

- Advertisement -

तालुकानिहाय टक्केवारी 

  • कल्याण (ग्रामीण) – ८३.०६ %
  • अंबरनाथ – ८१.४३ %
  • भिवंडी- ६६.३७ %
  • मुरबाड-७४.४७ %
  • शहापूर- ७३.५० %
  • ठाणे महापालिका क्षेत्र – ७८.९५ %
  • नवी मुंबई महापालिका क्षेत्र – ८१.५० %
  • भाईंदर महापालिका- ८०.५२ %
  • कल्याण-डोंबिवली- ८३.८३ %
  • उल्हासनगर- ७४.२८ %
  • भिवंडी महापालिका ६९. ३७ %

हेही वाचा – SSC Result : राज्यात ७७.१० टक्के निकाल; पुन्हा मुलींचीच बाजी

हेही वाचा – …म्हणून यंदा दहावीच्या निकालाचा टक्का घसरला; वाचा कारण!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -