घरठाणेठाण्यात एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप

ठाण्यात एसटी बसला आग, प्रवासी सुखरूप

Subscribe

ठाणे । ठाण्यातून सुमारे ६५ प्रवासी घेऊन भिवंडीला निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या (एसटी) बसला आग लागल्याची घटना ठाण्यातील उथळसर रोड येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लागली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठे अनर्थ टळले. बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

भिवंडी डेपोची बस मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास प्रवासी घेऊन ठाण्याकडून बस चालक आनंद विठोबा सवारे आणि वाहक अजित नामदेव कांबळे हे भिवंडीला निघाले होते. बस उथळसर प्रभाग समिती जवळ येताच बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

- Advertisement -

याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. याचदरम्यान सावधगिरी बाळगून बस चालक आणि वाहक तसेच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातच दुसरीकडे बसमधील प्रवाशांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या घटनेमुळे काही मिनिटे त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -