घरमहाराष्ट्रएसटीची हंगामी दरवाढ मागे

एसटीची हंगामी दरवाढ मागे

Subscribe

एसटीची हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली असून ६ नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित तिकिटदर आकारण्यात आले आहेत.

राज्यातील ग्रामीण भागाची लाइफलाइन असणाऱ्या एसटी महामंडळाने दिवाळीच्या काळात १० टक्के हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही दरवाढ २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत ही हंगामी भाडेवाढ सुरु होती. मात्र, ही दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली असून ६ नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित तिकिटदर आकारण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

२ कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त

यंदा दिवाळीच्या सुट्टीत २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) बससेवेसाठी मूळ तिकिटावर सरसकट १० टक्के दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे दररोज सुमारे २ कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे. या काळात एसटीच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल एसटी महामंडळाने प्रवाशांचे आभार देखील मानले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वाढत्या बेरोजगारी विरोधात मुंबईत आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -