घरमुंबईवाढत्या बेरोजगारी विरोधात मुंबईत आंदोलन

वाढत्या बेरोजगारी विरोधात मुंबईत आंदोलन

Subscribe

देशातील आर्थिक मंदी, महागाई आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाणार आहे.

भाजप सरकारच्या काळात संपूर्ण देशात आर्थिक मंदी निर्माण झालेली आहे. या आर्थिक मंदीमुळे महागाई आणि बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून बँकांची स्थिती देखील वाईट झालेली आहे. तसेच अवकाळी पाऊस आणि लहरी निसर्गामुळे कृषी क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ५ ते १५ नोव्हेंबर, दरम्यान मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये आणि शहरातील प्रत्येक वार्डमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

यासाठी करण्यात येणार आंदोलन

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई काँग्रेसचे सर्व नेते, सर्व जिल्हाध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. कारखाने बंद पडत आहेत. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. महागाई सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. बँकांची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. पीएमसी बँकेचे ग्राहक आज स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवत आहेत. तसेच महाराष्ट्रातील लहरी हवामानाचा फटका राज्यातील कृषी क्षेत्राला बसत आहे. या सर्व गोष्टींमुळे देशाची अर्थव्यवस्था खालावत चाललेली आहे. पण इतकी बिकट परिस्थिती असून सुद्धा भाजप सरकार त्यादृष्टीने कोणतीही पाऊले उचलताना दिसत नाही. त्यामुळे या बिकट परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC) निर्देशानुसार संपूर्ण देशात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जात असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

तसेच आज भाजप सरकार मुंबईतील सर्व रेल्वे वसाहतींचे खाजगीकरण करून ती जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव करत आहे. त्याविरोधात देखील मुंबई काँग्रेस आंदोलन करणार आहे.  – एकनाथ गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष

या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे आमदार आणि AICC च्या सरचिटणीस वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल, माजी आमदार मधू चव्हाण, वीरेंद्र बक्षी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष भंवरसिंह राजपुरोहित, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, महासचिव संदेश कोंडविलकर, मुंबई काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; भाजपकडून जाहीर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -