घरताज्या घडामोडीST Worker strike: एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको,...

ST Worker strike: एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको, अनिल परबांचे वक्तव्य

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात आली नाही. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप सुरुच ठेवला आहे. यामुळे कर्मचारी स्वतःचे नुकसान करत आहेत. तसेच लोकांचेही नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांनी अधिक ताणू नये अन्यथा बडतर्फ करण्याची कारवाई करु असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांशी संवाद सुरु आहेत. वेगवेगळ्या शिष्ट मंडळांशी चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यांमान दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे की, एसटीच्या बाबत कामगारांना मोठ्या प्रमाणात समजवण्याचा प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. वेगवेगळ्या शिष्टमंडळांना भेटत असून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु काही कर्मचारी अद्यापही मागणीवर ठाम आहेत. हायकोर्टाने देखील कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, एवढे दिवस आंदोलन सुरु ठेऊ शकत नाही. न्यायालयाच्या अवमानाबाबतची नोटीस प्रत्येक आगारात लावा असे कोर्टाने राज्य सरकारला सांगितले आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु एसटी कर्मचाऱ्यांशी आपले वैर नाही असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

एसटीच्या संपामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास होत आहे. कर्मचाऱ्यांशी जसे दायित्व आहे तसेच जनतेशी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जास्त ताणू नये कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, यामध्ये त्यांचे नुकसान होत आहे कोणत्याही नेत्याचे नुकसान होणार नाही आहे. कर्मचारी स्वतःचे नुकसान करत आहेत हे नुकसान कधीही न भरुन येणारे आहे असे अनिल परब म्हणाले आहेत.

अध्यक्षांची निवड अवाजी मतदानाने

राज्य सरकारने अध्यक्षांची निवड नियम बदलले आहेत. हात उंचावून मतदान करावे असा नियम काल विधानसभेत पारित झाला आहे. यामुळे हात उंचावून किंवा आवाजी मतदान पद्धतीने निवडणूक होणार आहे. राज्यपालांना तारीख पाठवली आहे. आता राज्यपालांनी ठरवायचे आहे. त्यामुळे राज्य सरकार घाबरण्याचे कारण नाही. १२ आमदारांच्या निलंबनाच्या बाबत महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत, दिग्विजय सिंह यांचं अजब विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -