घरमहाराष्ट्रशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Subscribe

महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी ५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’साठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी ५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष आणि महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर अशी ठेवण्यात आली आहे.

असा करावा अर्ज

अर्जदारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक तसेच कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक आणि संघटक, कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसचे ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

- Advertisement -

ऑनलाईन पद्धतीन अर्ज भरावा

सन २०१७-१८ या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ तसेच वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष – महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक आणि कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक तसेच संघटक- कार्यकर्ती यांच्यासाठी दिलेल्या नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह २५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन दिलेल्या नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर सादर करावयाचा आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात २७ नोव्हेंबर २०१८ पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावयाची आहे. तर उर्वरित पुरस्काराच्या अर्जदारांनी ५ डिसेंबर २०१८ च्या आधी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -