घरताज्या घडामोडीसोन्याचा मास्क घातलाय मला कोरोना होणार नाही, गोल्डन बाबाचा अजब दावा

सोन्याचा मास्क घातलाय मला कोरोना होणार नाही, गोल्डन बाबाचा अजब दावा

Subscribe

उत्तर प्रदेशमधील कानपुरच्या प्रसिद्ध गोल्डन बाबाने सोन्याचा मास्क बनवला

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मास्कचा वापर करणं जरुरीचे झाले आहे. कोरोना संकटात मास्कशिवाय कोणताही व्यक्ती घराबाहेर पडत नाही. रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या फेस मास्कचा आता अजब ट्रेंड सुरु झाला आहे. तरुण आणि तरुणी आपल्या आवडीचे आणि रंगीबेरंगी फॅशन ट्रेंडचे मास्क वापरतात तसेच बाजारातली सहज मिळतात. काहीजण आपल्या आवडीनुसार सोन्या-चांदिचे मास्क बनवून घेत आहेत. असच उत्तर प्रदेशमधील एका गोल्डन बाबाने सोन्याचा मास्क घातला आहे. हा मास्क घातल्यावर कोरोना होणार नाही असा दावाच या गोल्डन बाबाने केला आहे.

उत्तर प्रदेशमधील कानपुरच्या प्रसिद्ध गोल्डन बाबाने सोन्याचा मास्क बनवला आहे. सोन्याच्या मास्कमुळे गोल्डन बाबांविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गोल्डन बाब हे प्रसिद्ध मनोज सेंगर आणि मनोजानंद महाराज म्हणुनही ओळखले जातात. या गोल्डन बाबाने सोन्याचा मास्क बनवला आहे. सोन्याच्या मास्कची किंमत तब्बल ५ लाख रुपये आहे. मनोजानंद महाराज ऊर्फ गोल्डन बाबा यांचे म्हणणे आहे की, मास्कच्या आतील भाागात सॅनेटाईझरचा एक थर आहे जो ३६ महिन्यांपर्यंत काम करेल.

- Advertisement -

या सोन्याच्या मास्कला गोल्डन बाबाने शिव स्मरण मास्क असे नाव दिले आहे. कोरोनाची दुसरी लाट घातक आहे. काही लोक मास्क व्यवस्थित घालत नाहीत. सोन्याचा मास्कवर तीन थर बसवण्यात आले आहेत. सॅनिटाईज करण्यात आला असल्यामुळे हा मास्क ३ वर्षापर्यंत टिकू शकतो. गोल्डन बाबाला सोन्याचे दागिने घालण्याची आवड असल्यामुळे त्यांना गोल्डन बाबा असे नाव पडले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -