घरठाणेठाण्यात भाजी विक्रेत्यांचा कडकडीत बंद ; प्रशासनामुळे उपासमारीची वेळ

ठाण्यात भाजी विक्रेत्यांचा कडकडीत बंद ; प्रशासनामुळे उपासमारीची वेळ

Subscribe

तात्पुरते बसविलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना हप्ते घेऊन कायमस्वरूपी बसण्याचा काही मंडळींचा डाव आहे. त्याच्याविरोधात ठाण्यातील छत्रपती शिवाजी भाजी विक्रेता संघ आणि जिजामाता भाजी – फळ सेवा संघ या संघटनेच्या जवळपास ३५० अधिकृत विक्रेत्यांनी शनिवारपासून बेमुदत बंद पुकारला. यामुळे भाजी आणि फळ बाजारात या बंदमुळे शुकशुकाट पसरला होता. तसेच पहिल्याच दिवशी विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. तर यावेळी, प्रशासनामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोपही केला. तसेच ठाणेकर नागरिकांना वेठीस धरण्याचे कामही प्रशासनामार्फत होत आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही आंदोलन कर्त्यांनी दिला. दरदिवशी नेहमीप्रमाणे ठाणे, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातून भाजी बाजारात येणारे १५ ते २० ट्रक या आंदोलनामुळे आलेच नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगण्यात आले.

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून येथे भाजी आणि फळ विक्रेते होलसेल दरात आपला व्यवसाय जांभळी नाका येथे करत आहेत. मात्र, पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत मंडई बाहेरील रस्त्यावर अनधिकृत विक्रेते बसतात. त्यांच्या बाबत वारंवार तक्रार करून ही काही होत नाही. त्यांच्यावर पोलीस, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच गावगुंडाचा हात आहे. दिवसेंदिवस वाढत्या अनधिकृत विक्रेत्यांमुळे अधिकृत विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याच्या निषेधार्थ शनिवारपासून ३०० ते ३५० विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. याचदरम्यान त्यांनी निर्दशने करून जाहीर निषेध नोंदवला. तसेच कडकडीत बंद पाळून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा इशारा ही आंदोलन कर्त्यांनी दिली. या आंदोलनात पुरुष विक्रेत्यांसह महिला विक्रेत्यांनीही तितक्याच प्रमाणात सहभाग नोंदवला होता. हे आंदोलन असेच सुरू राहिल्यास याचा सर्वसामान्य जनतेवर नक्की परिणाम होईल असेही म्हटले जात आहे.

“प्रशासनाच्या नाकार्तेपणामुळे व अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याचे वेळ आली आहे. मग हे मार्केट कश्याला बांधले आहे. जर असेच अनधिकृत फेरीवाले बसवायचे तर हे मार्केट नावासाठी राहील.”

– अनिता जाधव, महिला विक्रेते.

“एकीकडे ऑनलाईन विक्री सुरू असताना, पहाटे ३ वाजल्यापासून अनधिकृत विक्रेते प्रशासनाच्या नाकार्तेपणाने बसत आहे. प्रशासनामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यामुळे आम्ही हे आंदोलन पुकारले असून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”

– श्याम म्हात्रे , अध्यक्ष, शिवाजी फळ विक्रेता संघ

 

” या मंडईत दररोज ठाणे, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातून १५ ते २० भाजीचे ट्रक येतात. ते आलेच नाहीत. तसेच उपासमारी वेळ आल्याने हा निर्णय घ्यावा लागला. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.”

– अंकुश ठोंबे, अध्यक्ष, शिवाजी भाजी विक्रेता संघ.

 

” या मंडईच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्यावर ठाणे नगर पोलीस, महापालिका अधिकारी व कर्मचारी आणि काही गावगुंड हे जबरदस्तीने भाजी विक्रेत्यांना बसवून आमच्या पोटावर पाय आणत आहेत. त्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी, पोलीस आणि पालिका आयुक्तांना वारंवार निवेदनाद्वारे तक्रार केलेली आहे. त्याच्यावर काही निर्णय होत नसल्याने दोन संघांनी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेत,त्याला सुरुवात केलेली आहे.”

-सुभाष ठोंबरे, अध्यक्ष , जिजामाता फळ-भाजी सेवा संघ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -