घरमनोरंजनतेलुगू अभिनेता पोसानी कृष्णा मुरली यांना तिसऱ्यांदा कोरोना

तेलुगू अभिनेता पोसानी कृष्णा मुरली यांना तिसऱ्यांदा कोरोना

Subscribe

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता आणि पटकथा लेखक पोसानी कृष्णा मुरली यांची तिसऱ्यांदा कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पोसानी कृष्ण मुरली पुण्यात त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते, तिथून ते हैदराबादला परतले मात्र हळूहळू त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले. कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली तेव्ही त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. आरटी-सीपीआर चाचणी केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

पोसानी कृष्णा मुरली हे तिसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. याआधी देखील कोरोनाच्या दोन लाटांमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cinema Kichidi (@cinema_kichidi)

- Advertisement -

दरम्यान, पोसानी अलीकडेच किरण अब्बावरमच्या मीटरमध्ये दिसले होते. शिवाय त्यांनी निखिल सिद्धार्थच्या 18 पेजेसमध्येही काम केले होते. पोसानी यांनी नागार्जुन, चिरंजीवी आणि महेश बाबू सारख्या सुपरस्टार अभिनीत रक्षा, अल्लुदा मजाका, एवद्रा राउडी, बॉबी यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. पोसानी कृष्णा मुरली यांनी अभिनयाव्यतिरिक्त 150 हून अधिक तेलुगू चित्रपटांसाठी लेखक म्हणून काम केले आहे. यासोबतच त्यांनी अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

मी माझ्या मुलांना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवतो… रितेश देशमुखचा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -