घरCORONA UPDATELockDown: एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरू होणार; परिवहन मंत्र्यांची घोषणा

LockDown: एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरू होणार; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Subscribe

लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटीची जिल्हांतर्गत वाहतूक राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन आणि कटेन्मेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून २२ मे, शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई आणि उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये महामंडळाकडून अत्यावश्यक सेवा सुरू आहे. तसेच मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी एसटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. नियमित सेवा सुरू नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्यांसाठी राज्यांतर्गंत सेवा सुरू कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत होता.

जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच एसटी सेवा 

मध्यंतरी राज्यांतर्गत सेवा सुरू करण्याचा निर्णयही घेतला. परंतु तो त्वरित मागे घेण्यात आला. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आले असून रेड आणि ऊर्वरित अशा दोन क्षेत्रांमध्ये राज्याची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये रेड झोन वगळता ऊर्वरित भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी रेड झोन आणि कटेन्मेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बससेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर शुक्रवारपासून एसटी बससेवा सुरू होत आहे.

- Advertisement -

काय आहेत अटी ?

जिल्ह्यांतर्गत सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत ही बससेवा सुरू राहील. तर प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील, सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही, प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केले आहे.

हेही वाचा –

नाथाभाऊंना ‘क्वारंटाइन’ का केलं?; आंदोलनावरुन गुलाबराव पाटलांचा भाजपला चिमटा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -