घरमहाराष्ट्रअसे प्रकार सारखे घडणं गंभीर; पुण्यात तरुणीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

असे प्रकार सारखे घडणं गंभीर; पुण्यात तरुणीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : पुण्यातील राजगडावर MPSC परीक्षेत तिसऱ्या क्रमांकाने पास झालेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह 18 जूनला आढळून आला. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे नावाच्या आरोपीला अटक केली. या घटनेच्या अवघ्या 10 दिवसांनी पुन्हा एकदा पुण्यात MPSC च्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडल्यामुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे या तरुणाने साहसी प्रसंगावधान दाखविल्यामुळे तरुणी थोडक्यात बचावली. तसेच पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे. सदर घटनेवरुन राज्यातील राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात केली असून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. (Such occurrences are serious Raj Thackerays criticism of the government after the attack on a young woman in Pune)

हेही वाचा – पुण्यातील तरुणीचा जीव वाचवणाऱ्या दोन तरुणांना प्रत्येकी 51 हजारांचे बक्षीस, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

- Advertisement -

राज ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता, म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी, अशी सरकारवर टीका केली. तसेच त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केले की, असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.

हेही वाचा – Pune crime : गृहमंत्र्यांनाही बहुधा कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ नसावा, अजित पवार यांचा टोला

काय आहे प्रकरण?

मंगळवारी (27 जून) सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ या ठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने वार केले. सदर आरोपी शंतनु जाधव हा मुलीचा मित्र असल्याचे सांगण्यात आले. हे दोघेही आधी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यानंतर या तरुणाने त्या मुलीला त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. पण तरुणीने या मुलाला नकार दिला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या आरोपी मुलाने मुलीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तसेच तिला तिच्या कॉलेजच्या बाहेर गाठून हा मुलगा मारहाण करत असल्याचे तरुणीकडून सांगण्यात आले.

या आरोपी तरुणाने मुलीला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर मंगळवारी ही मुलगी मित्रासोबत कॉलेजला जात असताना त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत तरुणीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ज्यामध्ये आरोपी मुलीच्या मागे कोयता घेऊन धावताना दिसत आहे. ही घटना घडत असताना काही नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. पण लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी धाडस करत आरोपीला पकडले. ज्यामुळे पुण्यात दर्शना पवार हत्येची पुनरावृत्ती टळली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -