घरमहाराष्ट्रधनंजय मुंडेना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; गुन्हा दाखल करण्यास स्थगिती

धनंजय मुंडेना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; गुन्हा दाखल करण्यास स्थगिती

Subscribe

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. मात्र औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मात्र त्याआधीच आज सकाळी बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्थानकात मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार राजाभाऊ फड हे काल रात्रीपासून बर्दापूर पोलीस स्थानकात बसून राहिल्यामुळे पोलिसांनी सकाळी सात वाजता गुन्हा दाखल केला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिल साठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा याचिकर्त्यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता.

- Advertisement -

या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्या ठिकाणी या प्रकरणावर आज सुनावणी होणार असताना पोलिसांनी आज पहाटेच बर्दापुर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर आज सकाळी दाखल झालेल्या गुन्ह्याही आता स्थगिती मिळाली आहे.

सुप्रीम कोर्टात आज धनंजय मुंडे यांच्या जगमित्र शुगर मिल्स प्रा.लि.ने विकत घेतलेल्या जमिनीबाबतची सुनावणी होणार होती. ही सुनावणी झाल्यानंतर निकालातून दिलासा मिळताच धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है, जज्बा है परिवर्तन का जिंदगी में, इसलिए सफर जारी है”.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -