घरमनोरंजन'ती' च्या अस्तित्वाची ओळख घडवणारा 'वेलकम होम'

‘ती’ च्या अस्तित्वाची ओळख घडवणारा ‘वेलकम होम’

Subscribe

उत्तम दिग्दर्शन, उत्तम लेखन, उत्तम संवाद आणि दर्जादार अभिनयाने परिपुर्ण असा हा चित्रपट आहे. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखक ,दिग्दर्शक जोडीचा चित्रपट पुन्हा एकदा वाहवा मिळवून जातो.

घरातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असते ती म्हणजे घरातील आई. पण तीचं नेमकं घरातील अस्तित्व काय? जी आपल्या घरासाठी राबराब राबते त्याचे नेमके घरे कोणते? तीला स्वता:चे घरे आहे का? तीला तीचं स्वातंत्र्य मिळतं का? घरच्यांना न विचारता ती एखादा हे असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत. या प्रश्नांची नेमकी उत्तरे कोणाकडेच नाहीयेत. पण तुम्ही ‘वेलकम होम’ हा चित्रपट बघितलात तर तुम्हाला या प्रश्नांची अगदी सहज सोप्पी उत्तरे मिळतील.

- Advertisement -

डॉ.सौदामिनी आचार्य (मृणाल कुलकर्णी) पुण्यातील सुशिक्षीत कुटूंबात वाढलेल्या, एका हुशार सीएशी लग्न करून पुण्यातच एका सुखवस्तू घरात राहणारी स्त्री. पण एकेदिवशी आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी घरातून बाहेर पडते आणि आपलं माहेर गाठते. आपल्या माहेरी ती एकटी येत नाही तर बरोबर आपली मुलगी कुकी ( प्रांजली श्रीकांत) आणि आपल्या सासूबाई माई म्हणजे (सेवा चौहान) यांना सोबत घेऊन येते. कारण त्यांची मानसिक अवस्था तितकीशी चांगली नसते. त्यांना अशा अवस्थेत घरात एकटं ठेवण्यापेक्षा ती त्यांना घेऊन माहेरी येते. सौदामिनीच्या माहेरी आईवडिल अप्पासाहेब जोशी(डॉ.मोहन आगाशे) आणि विमल जोशी( उत्तरा बावकर) आणि सौदामिनीची लहान बहिण मधुमती (स्पृहा जोशी) तीच्या अचानक येण्यामुळे काहीसे बावचळतात. पण तीच्यावर प्रश्नांचा मारा न करता तीला समजून घेतात. सौदामिनीचा नवरा तिच्याबरोबर भांडण झाल्याने कोणालाही न सांगता कुठेतरी निघून जातो.

- Advertisement -

सौदामिनी अचानक माहेरी तेही माईंना घेऊन आल्यामुळे घरात थोडी अडचण होते. पण ही अडचण आप्पा-आई सौदामिनीपर्यंत पोहचू देत नाहीत. सौदामिनीने परत सासरी जावे यासाठी सौदामिनीचा मित्र (सुमीत राघवन) मुंबईवरून पुण्याला तीची समजूत काढायला येतो. आई-आप्पाही त्यांच्यापरीने तीची समजूत काढतात. पण सौदामिनी आपल्या निर्णयावर ठाम असते. आजूबाजूल्या असणाऱ्या माणसावरून, त्यांच्या बोलण्यातून सौदामिनी आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळत जातात. प्रश्न तेच आपलं नेमकं अस्तित्त्व काय? आपलं नेमकं घर कोणतं? माहेर सोडल्यानंतर ते आपलं घर असतं का? की नवऱ्याच घरं हे आपलं घर? शेवटी सौदामिनीने आपल्या हक्कासाठीचा निर्णयात तिची माहेरची मंडळी ठाम उभी राहतात का ?या प्रश्नांच्या उत्तरावर सौदामिनी काय निर्णय घेते हे कळण्यासाठी एकदा सिनेमा नक्की बघा.

या चित्रपटात प्रत्येक पात्राच स्वत:च अस्तित्व आहे. प्रत्येक पात्राचे वेगळे स्वभाव आहेत. सगळ्यांनीच आपापली कामे उत्तम निभावली आहेत. स्पृहा जोशीच्या वाट्याला छोटी भुमिका आली असली तरी ती लक्षात राहते. स्वताचे विचार असणारी, परडखपणे मत मांडणारी,पत्रकार स्पृहाने मस्त वठवली आहे. त्याचप्रमाणे सुमीत राघवनने साकारलेला मित्र सुहासही जमून आला आहे. उत्तम दिग्दर्शन, उत्तम लेखन, उत्तम संवाद आणि दर्जादार अभिनयाने परिपुर्ण असा हा चित्रपट आहे. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखक ,दिग्दर्शक जोडीचा चित्रपट पुन्हा एकदा वाहवा मिळवून जातो. आताच्या पिढीचे प्रश्न मांडणारा, गंभीर विषय एकदी सोप्या शब्दात खूप काही शिवकवून जातो आणि विचार करायला भाग पाडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -