घरमहाराष्ट्रगृहमंत्री फडणवीस कायदा राखण्यात सपशेल अपयशी, हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंची...

गृहमंत्री फडणवीस कायदा राखण्यात सपशेल अपयशी, हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका

Subscribe

शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर याचा निषेध करण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक, कवी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रातून याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. परंतु, 48 तास होऊन देखील अहमदनगर पोलिसांकडून या घटनेची दखल घेण्यात न आल्याने त्यांच्या पत्नीने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ या प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पण शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर याचा निषेध करण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Supriya Sule criticizes Devendra Fadnavis after the fatal attack on Heramb Kulkarni)

हेही वाचा – लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, मुख्यमंत्री शिंदेंचे पोलिसांना निर्देश

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. त्यांचे गृहखात्याकडील अक्षम्य दुर्लक्ष सामान्यांच्या जीवावर बेतत आहे, असे लिहिले आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे.

सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत लिहिले आहे की, “भाजपच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन झाले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हि घटना अतिशय संतापजनक आहे. समतेच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली.‌ हे अतिशय चिंताजनक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. त्यांचे गृहखात्याकडील अक्षम्य दुर्लक्ष सामान्यांच्या जीवावर बेतत आहे. सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. या गुंडाना कोण अभय देतेय याचीही कसून चौकशी होण्याची गरज आहे. या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने गजाआड करा. या हल्ल्याचा तीव्र निषेध!” ही पोस्ट त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी देखील टॅग केली आहे.

- Advertisement -

काय आहे घटना?

हेरंब कुलकर्णी हे शनिवारी (ता. 07 ऑक्टोबर) शाळेतून आपला शिक्षक मित्र सुनिल कुलकर्णी यांच्यासोबत गाडीवरून घरी जात असताना अहमदनगरमधील रासने नगर येथील जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. हल्लेखोरांनी कुलकर्णी यांच्या दोन्ही पायावर, दोन्ही हातावर, पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. या घटनेत त्यांना चार टाके पडले. हल्लेखोरांकडून त्यांच्या डोक्यावर दुसरा फटका मारण्यात येत असताना त्यांच्या मित्राकडून तो अडविण्यात आला. त्यामुळे ते या घटनेतून थोडक्यात बचावले. या घटनेनंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण 48 तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही, अशी माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांच्यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -