घरमहाराष्ट्रपुणेSharad Pawar: दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवार यांची जाहीर सभा; युवा संघर्ष...

Sharad Pawar: दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवार यांची जाहीर सभा; युवा संघर्ष यात्रेची होणार सुरुवात

Subscribe

दसऱ्याच्या दिवशी शरद पवार पुण्यात सभा घेणार आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे. युवा संघर्ष यात्रेची सुरूवात शरद पवारांच्या सभेनं होणार आहे तसचं या यात्रेची सांगता देखील शरद पवारांच्या सभेनं केली जाणार आहे. 24 ऑक्टोबरला या संघर्ष यात्रेची सुरुवात होत आहे

पुणे : दसऱ्याच्या दिवशी शरद पवार पुण्यात सभा घेणार आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे. युवा संघर्ष यात्रेची सुरूवात शरद पवारांच्या सभेनं होणार आहे तसचं या यात्रेची सांगता देखील शरद पवारांच्या सभेनं केली जाणार आहे. 24 ऑक्टोबरला या संघर्ष यात्रेची सुरुवात होत आहे. त्यासाठी शरद पवार एक सभा घेणार आहेत. तसंच या यात्रेची सांगता नागपुरमध्ये केली जाणार आहे आणि त्यावेळी देखील शरद पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. (Sharad Pawar Sharad Pawar s public meeting in Pune on Dussehra Yuva Sangharsh Yatra will begin )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून शरद पवार पुन्हा एकदा पक्ष जोमाने उभा करणयासाठी बैठका, सभा घेत आहेत. बीड, येवला, कोल्हापूर यानंतर आता दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार पुण्यात सभा घेणार आहेत.

- Advertisement -

पुन्हा पक्ष उभारण्यासाठी पवारांचे प्रयत्न

पक्ष फूटीनंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी भाजप-शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यानंतर पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार राज्यभर दौरा, सभा आणि बैठका घेत आहेत.

शरद पवारांचा डाव काय?

राष्ट्रवादीतील आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवारांकडून संघटनात्मक बदल करण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले असून ठिकठिकाणी दौरे, सभा आणि बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि पंकजा मुंडे हे नेते जाहीर सभा घेत असतात. परंतु आता यावर्षी शरद पवार हे पुण्यात सभा घेणार असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: जातीय जनगणनेपासून वाचण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लॅन; 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी त्रिस्तरीय रणनीती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -