घरदेश-विदेशजातीय जनगणनेपासून वाचण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लॅन; 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी त्रिस्तरीय रणनीती

जातीय जनगणनेपासून वाचण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लॅन; 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी त्रिस्तरीय रणनीती

Subscribe

नवी दि्लली : निवडणूक आयोगाने आज (9 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत मिझोराम, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र या निवडणुका अशा वेळी होत आहेत, जेव्हा बिहार सरकारने राज्यात जात जनगणना लागू केली आहे. यामध्ये ओबीसी समाजातील लोकांची संख्या 63 टक्के असल्याचे आढळून आले आहे. तेव्हापासून राज्यात आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेसच्या आघाडीचा उत्साह वाढला आहे. एवढेच नाही तर काँग्रेस, समाजवादी पक्षासारखे पक्ष आता देशातील इतर राज्यांमध्येही असे सर्वेक्षण करण्याची मागणी करत आहेत. परंतु जात जणनेमुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपाला नुकसान सहन करावे लागेल, असे चित्र आहे.

हेही वाचा – BREAKING : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; राहुल गांधींकडून घोषणा

- Advertisement -

निवडणुक आयोगाच्या घोषणेनंतर भाजपाने आतापासूनच अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारने चालवलेल्या सामाजिक योजनांचा आम्ही प्रचार करू, असे भाजपाच्या रणनीतीकारांचे म्हणणे आहे. त्यांनी असेही म्हटले की, याद्वारे आम्ही लाभार्थी वर्गापर्यंत पोहोचू, ज्यांची संख्या 10 कोटी कुटुंबांपर्यंत म्हणजेच 50 कोटी एवढी आहे. सामाजिक योजनांच्या नावाखाली जाती-धर्मात विभागणी न करता मोठ्या संख्येने गरीब वर्गाला एकत्र आणता येईल, असे भाजपला वाटते. यामुळेच पंतप्रधान मोदी सतत त्यांच्या सरकारच्या योजनांची माहिती देत ​​आहेत, असेही रणनीतीकारांचे म्हणणे आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आरएसएसची घेणार मदत

जात जनगणनेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशात म्हणाले होते की, काही लोकांना हिंदू समाजात फूट पाडायची आहे. काँग्रेसला हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे. त्यामुळे हिंदू व्होट बँक एकत्र ठेवण्यासाठी भाजपा हिंदू एकतेवर भर देणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय सर्व जातीधर्माचे लोक सोबत यावेत यासाठी सामाजिक समरसतेवर भर दिला जाईल. यासाठी हिंदू समाजातील प्रत्येक वर्गात तळ ठोकून असलेल्या आरएसएसची मदत घेण्याचीही योजना भाजपाने आखली आहे. हिंदू मतांचे विभाजन रोखण्यासाठी अशाप्रकारची योजना तयार करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जम्मू काश्मीरला निवडणुकीची प्रतीक्षाच; निवडणूक आयोगाने केले सुरक्षेचे कारण पुढे

‘सबका साथ, सबका विकास’ आख्यान मांडणार निवडणुकीत

विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ओबीसी जातींमध्ये प्रवेश करू शकेल, असे भाजपाच्या लोकांनाही वाटते. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, भाजपाने ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी खूप काम केले आहे. आम्ही मुद्दाम एका देशासोबत आहोत, असे मुद्दे विरोधी पक्षाचे लोक विनाकारण मांडत आहेत. एवढेच नाही तर समाजातील मोठ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने काही योजनाही जाहीर केल्या आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हे आख्यानही भाजपला निवडणुकीत मांडायचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -