घरमहाराष्ट्रSupriya Sule On Patel: खरंच, वय हा फक्त आकडा असतो; सुळेंचा पटेलांना...

Supriya Sule On Patel: खरंच, वय हा फक्त आकडा असतो; सुळेंचा पटेलांना टोला

Subscribe

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रामबाई यांचे कौतुक करताना एक ट्वीट केलं. प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, रामबाईंची इच्छाशक्ती आणि पॅशन पाहिलं तर वय हा फक्त एक नंबर आहे याची जाणीव होते. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी वयाची कोणतीही एक्सपायरी डेट नसते हे 107 वर्षांच्या रामबाईंनी सिद्ध केलंय.

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर दोन्हीकडील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका खेळाडूचे कौतुक करणारे ट्वीट केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या ट्वीटला रिप्लाय करत पटेलांना टोला लगावला आहे. (Supriya Sule On Patel Indeed age is just a number Sule tola to Patel)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रामबाई यांचे कौतुक करताना एक ट्वीट केलं. प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, रामबाईंची इच्छाशक्ती आणि पॅशन पाहिलं तर वय हा फक्त एक नंबर आहे याची जाणीव होते. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी वयाची कोणतीही एक्सपायरी डेट नसते हे 107 वर्षांच्या रामबाईंनी सिद्ध केलंय. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या नॅशनल मास्टर्स अॅथलिटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण पदकं जिंकली. त्यामुळे कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे आपण मनावर बिंबवूया आणि त्या पद्धतीने काम करूया अशा आशयाचे ट्वीट प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्यांच्या या ट्वीटवर शरद पवार गटाकडून जोरदार हल्ला केल्या जात असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी मोजक्या शब्दांत प्रफुल्ल पटेलांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थ आमदार, खासदारांनी अनेकवेळा शरद पवार यांच्या वयावरुन टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर भर सभेत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली आहे. अशातच आज अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी खेळाडुचं कौतुक करणारे ट्वीट केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर मोजक्याच शब्दांत हल्ला चढवला आहे. सुळेंनी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या या ट्विटला खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच वाक्यात रिप्लाय दिला आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे, वय हा फक्त एक नंबर आहे. अशा शब्दांत त्यांनी प्रफुल्ल पटेलांना टोला लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -