घरमहाराष्ट्रSupriya Sule : हे तर सुडाचे राजकारण; का म्हणाल्या सुप्रिया सुळे असं...

Supriya Sule : हे तर सुडाचे राजकारण; का म्हणाल्या सुप्रिया सुळे असं…

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ऍग्रो कारखान्यावर जप्ती आणण्यात आली आहे. ईडीकडून बारामती ऍग्रो कंपनीच्या मालकीची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ईडीने एकूण 161 एकर जमीन जप्त केली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर स्वतः रोहित पवार यांनी ट्विट करत, आता भाजपात जायचे का, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एजन्सीची भीती दाखवली जातेय

आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा कन्नड साखर कारखाना ईडीने जप्त केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी या कारवाईवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केली आहे. ही कारवाई करण्याचं टायमिंग बघा. लोकांचा कल त्यांच्या बाजूने नसला तर एजन्सीचा वापर करून भीती दाखवली जात आहे. हा लोकशाहीचा विरोधाभास असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सुडाचे राजकारण इतकी पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं. एखादा युवक संविधानाच्या चौकटीत राहून भाषण करतो, त्यावर कारवाई होणे दुर्दैवी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar : आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचा खोचक टोला

काय आहे प्रकरण?

कन्नड सहकारी साखर कारखाना भंगारात निघाल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला. 50 कोटी रुपयांमध्ये हा कारखाना रोहित पवारांच्या बारामती ऍग्रो लिमिटेड या कंपनीने खरेदी केला. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणात ईडीकडून बारामती अ‍ॅग्रोची चौकशी सुरू होती. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे परस्परांतले व्यवहार संशयास्पद असल्याचा ईडीचा आरोप आहे.

- Advertisement -

रोहित पवारांची ईडी कार्यालयात चौकशी

बारामती ऍग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं कारवाई केली आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती ऍग्रो कंपनीची मालकी आहे. याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांची या आधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचा – MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंचे ‘ते’ आरोप राहुल नार्वेकरांनी खोडून काढले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -