घरमहाराष्ट्रसर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष - सुप्रिया सुळे

सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष – सुप्रिया सुळे

Subscribe

राज्यात एक सत्ताधारी पक्षाच्या आमदार मुलींना उचलून आणण्याची भाषा करतो आणि गृहमंत्रीपद असणारे मुख्यमंत्री त्याविषयी काहीच बोलत नाहीत. राज्यातील समस्त महिला वर्गाचा हा अपमान आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी ठाण्यात केला.

देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुति देणाऱ्या शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञा यांनी अतिशय लाजिरवाणे मत व्यक्त करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाहीच, उलट भाजप नेते त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, ही लाजीरवाणी बाब आहे. राज्यात एक सत्ताधारी पक्षाच्या आमदार मुलींना उचलून आणण्याची भाषा करतो आणि गृहमंत्रीपद असणारे मुख्यमंत्री त्याविषयी काहीच बोलत नाहीत. राज्यातील समस्त महिला वर्गाचा हा अपमान आहे, अशी घणाघणी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ठाण्यात केला. या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रशद्ब्राांशी कोणतेही देणेघेणे नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

प्रचार सभेत वक्तव्य 

ठाणे येथील टीप-टॉप प्लाझा सभागृहात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ महिला कार्यकत्र्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात बोलताना त्यांनी भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षातील फसलेल्या योजनांचा पाढा वाचला. तसेच त्यानंतर पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा समाचार घेतला. उमेदवार आनंद परांजपे, आमदार जीतेंद्र आव्हाड, माजी खासदार संजीव नाईक आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

देशात स्मार्ट सिटी योजना फसली

मराठी शाळा बंद करण्याचा युती शासनाचा डाव असून आम्ही ते होऊ देणार नाही. डान्सबार बंदी उठविण्याची मागणी कुणीही केली नव्हती. तरीही शासनाने बंदी उठवली. संपूर्ण देशात स्मार्ट सिटी योजना फसली आहे. गोरगरिबांना रास्त दरात वस्तू मिळाव्यात म्हणून रेशनिंगची व्यवस्था होती. या सरकारने गरीबांची ती सवलतही बंद करून टाकली. राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. स्टार्टअप, डिजीटल इंडियासारख्या योजना फसल्या आहेत. या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली. सध्या निवडणूक प्रचारात भाजपकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत, असाही दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -