घरलाईफस्टाईललांब आणि दाट पापण्यांसाठी घरगुती उपाय

लांब आणि दाट पापण्यांसाठी घरगुती उपाय

Subscribe

डोळ्यांच्या पापण्या लांब आणि दाट होण्यासाठी हे करा घरगुती उपाय

सौंदर्य खुलविण्यासाठी प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतात आणि ते जपण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. तसेच चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी डोळ्याची फार मोठी भूमिका असते. त्यासोबत डोळ्यांचं सौंदर्य खुलविण्यात डोळ्यांच्या पापण्यांचं मोठे योगदान असते. परंतु जर तुमच्या पापण्या दाट नसतील तर, त्यासाठी महागड्या ट्रिटमेंट घेण्याऐवजी काही घरगुती उपाय केल्यास तुमच्या पापण्या दाट होण्यास मदत होऊ शकते.

एरंडेल तेल

एरंडेल तेल रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर लावल्यामुळे पापण्या दाट होण्यास मदत होते. एका कॉटन बॉलच्या मदतीने हे तेल हलक्या हाताने पापण्यांवर लावा आणि हाताच्या बोटांनी मसाज करा. यामुळे पापण्या दाट होण्यास मदत होते.

- Advertisement -

ग्रीन टी

पिण्यासाठी वापरण्यात येणारी ग्रीन टी शरिराप्रमाणे पापण्या दाट करण्यासाठी देखील उपयोगी ठरते. ग्रीन टी थंड करुन कॉटने पापण्याला लावल्याने पापण्या दाट होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये अस्तित्वात असणारे अॅन्टीऑक्सिडंट तत्व पापण्यांसोबत तेथील त्वेचेसाठी परिणामकारक ठरते.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल केसांच्या वाढिसाठी मदत करतं. कापसाच्या मदतीने ऑलिव्ह ऑइल पापण्यांवर लावल्याने पापणीचे केस दाट होण्यास मदत होते. यामुळे मृत पेशी निघून जाऊन पापण्यांच्या केसांची वाढ होण्यास मदत होते.

- Advertisement -

पेट्रोलियम जेली

पापण्यांवर पेट्रोलियम जेली लावल्याने पापण्यांचे केस दाट होण्यास मदत होते.

आयलिड्स

डोळ्यांच्या आयलिड्समुळेच पापण्यांच्या केसांची वाढ होते. येथील ब्लड फ्लो जर सुरळीत असेल तर पापण्यांची वाढ होण्यास मदत होते. दोन्ही डोळ्यांना आय लिडवर मसाज केल्याने रक्त प्रवाह वाढविण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -