घरमनोरंजनTejaswini Pandit : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर तेजस्विनीची पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Tejaswini Pandit : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर तेजस्विनीची पोस्ट, नेटकरी म्हणाले…

Subscribe

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून विविध विषयांवर पोस्ट करत असते. गेल्या काही महिन्यात तिने राजकीय विषयांवरही आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कालच (ता. 06 फेब्रुवारी) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. ज्यामुळे राजकीय क्षेत्रात आणखी एक भूकंप झाला आहे. याच निर्णयासाठी सूचक असे विधान अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने पोस्ट केल्याने सध्या सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे. आज (ता. 07 फेब्रुवारी) तिने ही पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी समर्थन दिले आहे. तर काहींनी तिच्यावर या पोस्टमुळे टीका केली आहे. (Tejaswini Pandit post after Election Commission results)

हेही वाचा… NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

- Advertisement -

“जनता मूर्ख नाही, सगळं जाणते. बेइमानी ओळखते. लक्षात घेणे!” असे तेजस्विनी पंडितने X या सोशल मीडिया साइटवरील तिच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट केलेले आहे. पण ही पोस्ट कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सूचक अशी असल्याने या निर्णयाच्या विरोधात तिने ही पोस्ट केल्याचे म्हटले जात आहे. तिच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत तिची शाळा घेतली आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

तेजस्विनी पंडित ही कोणत्याही राजकीय पक्षात वैयक्तिकरीत्या सहभागी नाही. पण ती राज ठाकरे यांना पाठिंबा देते, अशी माहिती आहे. कारण तिने बऱ्याचदा राज ठाकरे यांच्या पोस्ट शेअर केलेल्या आहेत. त्यांच्या भाषणातील विविध मुद्दे तेजस्विनी तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण तिने आज केलेल्या या पोस्टमुळे तिने हा टोला अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना लगावल्याचेही आता बोलले जात आहे. तेजस्विनीने याआधी सुद्धा राजकारणातील घडामोडींवर आपले मत परखडपणे मांडले आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयावर अनेक अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. काहींना निवडणूक आयोगाचा हा निकाल बरोबर वाटला आहे, तर काहींना हा निर्णय लोकशाहीची हत्या करणारा वाटला आहे. तर आता मराठी अभिनेत्रीनेच या घटनेवर सूचक वक्तव्य केल्याने याबाबत चर्चा करण्यात आहे. तेजस्विनी आता आगामी स्वराज्य कनिका जिजाऊ सिनेमात जिजाऊंची भूमिका साकारताना दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -