घरठाणेठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी

ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Subscribe

शिवसेना शहर शाखेचे माजी शहरप्रमुख आणि ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची बुधवारी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून चौधरी हे ओळखले जात होते. त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राऊत यांनीच आपल्या ट्वीटरवरून सर्वप्रथम केली. रात्री भाऊ चौधरी यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला.

भाऊ चौधरी हे संजय राऊत यांचे खंदे समर्थक होते. पुढे भाऊ चौधरी शहर प्रमुख आणि परिवहन समितीचे सभापती झाले. २०१५ च्या केडीएमसीच्या निवडणुकीत भाऊ चौधरी यांना गोग्रासवाडी अंबिका नगर प्रभागातून उमेदवारी देखील देण्यात आली होती. मात्र त्यावेळी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्‍या महेश पाटील यांनी भाऊ चौधरी यांचा पराभव केला होता.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांच्याकडे नाशिकची जबाबदारी होती. भाऊ चौधरी हे देखील नाशिक जिल्ह्यातील भूमिपुत्र होते. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणुकीत पराभूत झाल्यावरही भाऊ चौधरी यांना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी डोंबिवली शिवसेनेच्या कामातून अंग काढून घेतले होते. भाऊ चौधरी हे ऑक्सिजन पुरवठा करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्या डोंबिवली आणि अंबरनाथ येथे कंपन्या आहेत. कोरोना काळात ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना पुरेसा आणि वेळेवर ऑक्सिजन पुरवठा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीत होते.

त्यावेळी ऑक्सिजन पुरवठा करण्याची जबाबदारी चांगली पार पाडली म्हणून त्यांना ऑक्सिजन मॅन म्हणून संबोधले जात होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर भाऊ चौधरी देखील शिंदे गटात जाणार अशी दबक्या आवाजात चर्चा होती. पुढे शिंदे गटाने डोंबिवली शाखेचा ताबा घेतला त्यावेळी देखील भाऊ कधी पुढे आले नाहीत. बुधवारी संध्याकाळी खासदार संजय राऊत यांनीच भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे ट्वीट केले. तोपर्यंत भाऊ नागपुरात पोहोचले होते. रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -