घरताज्या घडामोडीCORONA VIRUS: कायदा मोडणाऱ्यांना होणार तुरुंगवास

CORONA VIRUS: कायदा मोडणाऱ्यांना होणार तुरुंगवास

Subscribe

साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic Diseases Act) लागू करण्यात आला आहे.

देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकाने करोना व्हायरसला आपत्ती घोषित केली आहे. करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर, त्यांच्या कुटुंबाला ४ लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली. दरम्यान, करोनाने देशाची परिस्थिती बिघडत जात असल्यामुळे साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic Diseases Act) लागू करण्यात आला आहे. हा कायदा महाराष्ट्रात देखील लागू करण्यात आला आहे.

एखाद्या आजाराला आळा घालण्यात जेव्हा असफल होतो तेव्हा हा कायदा अंमलात आणला जातो. या कायद्याद्वारे राज्य सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. राज्य सरकारने करोनाबाबतीत जे निर्बंध घातले आहेत, ते जर कोणी मोडले तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. राज्याच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा वर्षाचा तुरुंगवास होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मास्कचा काळाबाजार आणि नकली सॅनिटायझर बनवणाऱ्यांवर होणार कारवाई

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता २६ वर पोहोचली असून देशात करोनाचे ८४ रुग्ण आहेत. यामधील दोघांचा मृत्यू झाला असून १० रुग्ण बरे झाले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -